Devendra Fadnavis Press Conference : फडणवीसांनी फोडला बॉम्ब: अंडरवर्ल्डशी नवाब मलिक कुटुंबियांचे संबंध, 93 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून घेतली जमीन

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 09, 2021 | 14:20 IST

Devendra Fadnavis Press Conference :  विरोधीपक्ष नेते (Leader of Opposition) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

Nawab Malik family ties to the underworld
अंडरवर्ल्डशी नवाब मलिक कुटुंबियांचे संबंध   |  फोटो सौजन्य: फेसबुक
थोडं पण कामाचं
  • 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी असलेल्या सरदार शाह वली खान हे सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
  • सलीम पटेल म्हणजे एका इफ्तार पार्टीत आर.आर.पाटील यांच्यासोबतच्या एका फोटोत होता.
  • 4 प्रॉपर्टीत 100 टक्के अंडरवर्ल्डचा अँगल असून याचे पुरावे तपास संस्थांना देणार

Devendra Fadnavis Press Conference : मुंबई :  विरोधीपक्ष नेते (Leader of Opposition) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत (Press Conference ) सांगितल्याप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे अंडरवर्ल्डशी (underworld) संबंध आहेत. त्यांनी कवडीमोल भावात अंडरवर्ल्डच्या लोकांकडून मुंबईत 3 एकर जमीन घेतली. त्याचे पुरावे आपण योग्य त्या तपास संस्थेकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देणार असे फडणवीस यांनी सांगितले आहे. 

देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी मी एक घोषणा केली होती. काही गोष्टी दिवाळीनंतर मी तुम्हा सर्वांसमोर मांडेल. पण काहीसा उशीर झाला. कागदही गोळा होत होते. काही लोकांच्या पत्रकार परिषदांचे दिवस आधीच बुक होते. म्हणून मला थोडासा वेळ लागला. मी जे सांगणार आहे तो अत्यंत गंभीर आणि राष्ट्राच्या सुरक्षेशी निगडीत मुद्दा आहे. सर्वात आधी मी दोन पात्रांबाबत मी तुम्हाला सांगणार आहे. फडणवीस यांनी 93 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींविषयी गौप्यस्फोट केला आहे.

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी असलेल्या सरदार शाह वली खान हे सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर टायगर मेमनच्या नेतृत्वात बॉम्ब कुठे ठेवायचे याची रेकी केली होती. तसेच मेमनच्या घरी गाड्यांमध्ये आरडीएक्स भरणारे हे होते. तसेच त्यांना या स्फोटाप्रकरणी संपूर्ण माहिती होती. दुसरे व्यक्ती सलीम पटेल. हा सलीम पटेल म्हणजे एका इफ्तार पार्टीत आर.आर.पाटील यांच्यासोबत फोटो आला. त्यावरुन त्यांना ट्रोल केलं गेलं होतं. हा सलीम पटेल म्हणजे हसिना पारकरचा प्रमुख माणूस. त्याच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी तयार व्हायच्या, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. 

पार्टी एका इफ्तार पार्टीसाठी गेले होते. त्यानंतर एका दाऊदच्या माणसासोबत त्यांचा फोटो आला होता. तो माणूस म्हणजे, सलीम पटेल.", हे सांगताना आर. आर. पाटलांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता, फोटोमुळे त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, असंही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मोहम्मद सलीम पटेल हा दाऊदचा माणूस. दाऊची बहिण हसीना पारकरचे ते चालक होते."  "कुल्यामध्ये एलबीएस रोडवर जवळपास 3 एकराची जागा आहे. एलबीएस रोडवर अगदी महागडी जागा होती. सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांनी मलिक कुटंबाच्या कंपनीला जमीन विकली. या कंपनीच्या वतीने जागेच्या कागदपत्रांवर फराज मलिक यांनी सही केली आहे. आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची आहे. काही काळ स्वतःनवाब मलिकही या कंपनीचे डायरेक्टर होते. 

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांनी सॉलिडस कंपनीला ही जागा केवळ 30 लाख रुपयांना विकली आहे. कुर्ल्यातील जवळपास तीन एकर जमीन 30 लाखांना विकली. तर याचे पेमेंट केले आहे 20 लाखांचे. आजही त्या ठिकाणी एक मोठं शेड सॉलिडस कंपनीने भाड्याने दिलेले आहे.", असं ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, "मला मिळालेल्या माहितीनुसार, आजही एक कोटी महिना या जागेचे भाडे सॉलिडसला मिळते." असेही फडणवीस म्हणाले.

नेमका व्यवहार काय आणि कसा?

20 लाखात एलबीएस रोडवर 3 एकर जमीन खरेदी झाली. पॉवर ऑफ अर्टनीमध्ये टेनंट वेगळा, रजिस्ट्रीवेळी वेगळा, किंमत कमी दाखवण्यासाठी हे केलं गेलं. याची किंमत 3.50 कोटी दाखवली. रजिस्ट्री कमी दाखवण्यासाठी हे केले गेले. रेडी रेकनर 8500 रु. स्वे.मीटर मार्केट रेट 2 स्वेअर फीट, खरेदी झाली 25 रुपये स्वे.फूटने आणि स्टँप ड्युटी भरली 15 रुपये स्वेअर फूटने, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. 

पवारांनाही पुरावे देणार

1993 मध्ये आम्ही लोकांचे चिंधडे उडताना पाहिले. हे ज्यांनी केलं त्यांच्यासोबत तुम्ही व्यवहार करता. ही एकच नाही अशा 5 प्रॉपर्टी मला सापडल्या आहेत. त्यातील 4 प्रॉपर्टीत 100 टक्के अंडरवर्ल्डचा अँगल असल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय. हे सगळे पुरावे मी तपास संस्थांना देणार आहे. त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार यांनाही हे पुरावे देणार आहे. त्यामुळे त्यांनाही कळेल की आपल्या मंत्र्यांनी काय दिवे लावले आहेत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी