Nawab malik vs Devendra Fadanvis:  फडणवीसांबाबत उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार : नवाब मलिक 

Nawab malik on underworld connection Alligation : :  अंडरवर्ल्ड संबंधित लोकांच्या जमिनी कवडीमोल भावाने  विकत घेतल्याचा विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लावलेला आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी फेटाळून लावले आहेत.

nawab malik gave reply to allegation of devendra Fadnavis about underworld connection
फडणवीसांबाबत उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार : नवाब मलिक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अंडरवर्ल्ड संबंधित लोकांच्या जमिनी कवडीमोल भावाने  विकत घेतल्याचा विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लावलेला आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी फेटाळून लावले आहेत.
  • उद्या सकाळी दहा वाजता फडणवीस आणि आंतरराष्ट्रीय अंडरवर्ल्ड डॉन याचे कसे संबंध होते
  • हायड्रोजन बॉम्ब मी फोडणार असल्याचे मलिक यांनी यावेळी सांगितले.

Nawab malik vs Devendra Fadanvis । मुंबई :  अंडरवर्ल्ड संबंधित लोकांच्या जमिनी कवडीमोल भावाने  विकत घेतल्याचा विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लावलेला आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी फेटाळून लावले आहेत. पण उद्या सकाळी दहा वाजता फडणवीस आणि आंतरराष्ट्रीय अंडरवर्ल्ड डॉन याचे कसे संबंध होते याचा हायड्रोजन बॉम्ब मी फोडणार असल्याचे मलिक यांनी यावेळी सांगितले. (nawab malik gave reply to allegation of devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस हे दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार होते, पण त्यांनी बॉम्ब न फोडता अवडंबर माजवलं आहे. पराचा कावळा करण्याचे काम फडणवीस यांनी केले आहे.  फडणवीस ज्या गोवावाला कम्पाउंडच्या जागेबद्दल बोलत आहेत, त्यात आम्ही भाडेकरू होतो. जागेची मालकीण गोवावाला यांनी आम्हांला ही जागा विकण्यासंदर्भात सांगितले. त्यानंतर आम्ही कायदेशीर व्यवहार करून ही जागा विकत घेतली. यात पावर ऑफ अटर्नी सलीम पटेल यांच्या नावावर होती. मालकीणीने ती त्यांना दिली होती, त्यामुळे व्यवहार करण्यासाठी एक भाडेकरू म्हणून जे कायदेशीर कारवाई करायची होती ती आम्ही केली. 

दुसरा प्रश्न होता सरदार शाहवली खान यांचे वडील गोवावाला कुटुंबियांकडे वॉचमन म्हणून काम करत होते. तसेच पॉपर्टीच्या भाड्याची वसुली करत होते. त्या सरदार वली खान याने ३०० मीटरची जमीन सात बाऱ्यावर आपल्या नावावर केली होती. जेव्हा संपूर्ण जमीन खरेदी करण्याचा प्रश्न आला तेव्हा ही जमीन सरदार वली खान यांच्या नावावर होती. त्याला पैसे देऊन ती मोकळी करण्यात आली. इतका आमचा आणि त्यांचा संबंध असल्याचे नवाब मलिक यांनी फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले. 

फडणवीसांच्या आरोप

नवाब मलिक मंत्री असताना कुर्ल्याची जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतली आहे. या जमीनी अंडरवर्ल्डशी संबंधीत असलेल्या व्यक्तींची होती. सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल या मुंबई बॉम्ब स्फोटाशी संबंधी व्यक्तींच्या या जमीनी होत्या. टाडामुळे जमीन जप्त होईल यामुळे या जमिनी खरेदी करण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर केला आहे. 

उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार 

फडणवीस म्हणत होते बॉम्ब फोडणार पण त्यांनी अवडंबर उभे केले आहे. आता बॉम्ब काय असतो तो उद्या सकाळी दहा वाजता पाहा. फडणवीस यांच्या जवळचे लोक मुंबईतील मौक्याच्या जागा हडप करण्याचा कसे काम करतात. हे परदेशात बसलेल्या अंडरवर्ल्ड डॉनच्या सांगण्यावरून याचा खुलासा करणार आहे. फडणवीस यांनी मुंबईच्या लोकांना कसे वेठीस धरले होते. याचा पुरवाज देणार आहे, असे मलिक म्हणाले.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी