उनकी नींद खो गई है, अब चैन खोने का वक़्त आ गया है, नवाब मलिकांनी फडणवीसांना डिवचलं

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 10, 2021 | 09:59 IST

मुबंईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आर्यन खानच्या अटकेपासून सुरू झालेला वाद आता अटकेपर्यंत न राहता तो राजकीय झाला आहे.

Nawab Malik Tweet on Devendra Fadnavis before His Press Conference
नवाब मलिकांनी फडणवीसांची झोप उडवली   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे अंचरवर्ल्डशी संबंध - फडणवीस
  • मलिक आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार
  • फडणवीस यांचे गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधांचा मलिक स्फोट करणार

मुंबई : मुबंईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आर्यन खानच्या अटकेपासून सुरू झालेला वाद आता अटकेपर्यंत न राहता तो राजकीय झाला आहे. यामुळे फडणवीस आणि मलिक हे आमने-सामने आले असून काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंचरवर्ल्डशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप करत आपला बॉम्ब फोडला.  फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी मलिक आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

या पत्रकार परिषदेत फडणवीसांवर मोठा बॉम्ब फोडणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.फडणवीसांचे कोणत्या अंडरवर्ल्डशी संबंध आहेत आणि ते कसे आहेत, याची चिरफाडच करणार असल्याचं मलिकांनी सांगितलं आहे. फडणवीस यांचे गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधांचा उद्या स्फोट करणार आहे, असा इशारा नवाब मलिक यांनी कालच्या पत्रकार परिषदेत दिला होता. दरम्यान नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदे आधी ट्वीट करत फडणवीसांना डिवचलं आहे.  “उनकी नींद खो गई है,अब चैन खोने का वक़्त आ गया है. मिलते है आज सुबह १० बजे”, असं नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आता मलिक विरुद्ध फडणवीस वाद 

नवाब मलिक यांनी एनसीबीच्या समीर वानखेडे यांच्याविरोधात रान पेटवले आहे. दिवाळीनंतर मोठा बॉम्ब फोडू म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते फडणवीसांनी काल पत्रकार परिषद घेत मलिकांवर गंभीर आरोप केले. मलिकांचे संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर मलिकांनीही अगदी काही वेळात पत्रकार परिषद घेऊन त्यांचे आरोप फेटाळून लावले. तसेच उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांचीच पोलखोल करणार असल्याचे मलिकांनी सांगितले. 

1993 च्या मुंबई बॉम्बब्लास्टमधील आरोपीकडून नवाब मलिक यांनी कोट्यवधींची जमीन केवळ 20 लाखांत विकत घेतली, ती कशी? आणि मुंबईकरांच्या चिंधड्या उडवणाऱ्या व्यक्तींशी मलिकांनी व्यवहार केला कसा? असे सवाल कालच्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी उपस्थित केले. तसंच इतरही आणखी 4 व्यवहारात मलिकांचे अंडरवर्ल्डशी लागेबांधे असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी