Nawab Malik vs Sameer Wankhede: नवाब मलिकांच्या मेव्हणीच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचं उत्तर

समीर वानखेडे यांची मेव्हणी हर्षदा वानखेडे हिच्यावर हा सवाल उपस्थित करताना मलिकांनी समीर वानखेडेंना उत्तर देण्यास सांगितलं. या सवालावर समीर वानखेडेंनी उत्तर दिलं आहे.

Nawab Malikanchaya Mevanichya Questionnaire Samir Wankhedencham Answer
नवाब मलिकांच्या मेव्हणीच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचं उत्तर 
थोडं पण कामाचं
  • समीर वानखेडे यांची मेव्हणी हर्षदा वानखेडे हिच्यावर हा सवाल उपस्थित करताना मलिकांनी समीर वानखेडेंना उत्तर देण्यास सांगितलं. या सवालावर समीर वानखेडेंनी उत्तर दिलं आहे.
  • समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोप करताना त्यांच्या मेहुणी (sister-in-law) ड्रग्ज व्यवसायात आहे का असा सवाल उपस्थित केला आहे.
  • हा सवाल उपस्थित करताना मलिकांनी समीर वानखेडेंना उत्तर देण्यास सांगितलं. या सवालावर समीर वानखेडेंनी उत्तर दिलं आहे.

मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader Nawab Malik) नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा नवा आरोप केला आहे. यावेळी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोप करताना त्यांच्या मेहुणी (sister-in-law) ड्रग्ज व्यवसायात आहे का असा सवाल उपस्थित केला आहे. हा सवाल उपस्थित करताना मलिकांनी समीर वानखेडेंना उत्तर देण्यास सांगितलं. या सवालावर समीर वानखेडेंनी उत्तर दिलं आहे. (Nawab Malikanchaya Mevanichya Questionnaire Samir Wankhedencham Answer)

नवाब मलिकांच्या सवालावर उत्तर देताना समीर वानखेडे म्हणाले की, जानेवारी 2008 मध्ये जेव्हा हे प्रकरण घडले तेव्हा मी सेवेतही नव्हतो. मी 2017 मध्ये क्रांती रेडकरशी लग्न केलं. मग तरीही मी या केसशी कसा जोडला जातो?, असा सवालही समीर वानखेडे यांनी उपस्थित केला आहे.

नेमकी क्रांती रेडकरच्या बहिणीविरोधात तक्रार कोणती?

क्रांती रेडकरच्या बहिणीच्या हर्षदा रेडकरच्या विरोधातला 2008 मध्ये दाखल असलेला गुन्हा अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार नाही तर बेकायदा देहविक्री केल्याप्रकरणीचा गुन्हा असल्याची ऑफ रेकॉर्ड माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

नवाब मलिक यांचा सवाल

आता नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना ट्विट करून विचारले आहे की, तुमची मेहुणीही ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? नवाब मलिक यांनी नवा दावा केला आहे की, समीर वानखेडेंची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर यांच्याविरुद्ध पुणे न्यायालयात ड्रग्जचा खटला सुरू आहे. नवाब मलिकांनी या मुद्द्यावर समीर वानखेडे यांच्याकडून उत्तर मागितलं होतं.

नवाब मलिक यांनी ट्विट करून समीर वानखेडे यांना सवाल केला की, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यानं तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. हा याचा पुरावा असल्याचं ट्विट मलिकांनी केला आहे.

विशेष म्हणजे आर्यन खानला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यापासून नवाब मलिक एनसीबीच्या समीर वानखेडेवर सातत्यानं नवनवे आरोप करत आहे. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आपल्या खाजगी लष्करामार्फत ड्रग्ज रॅकेट चालवल्याचा आरोप केला आहे. यासोबतच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या मालमत्तेवरही प्रश्न उपस्थित करत ते कोट्यवधीचे कपडे घालतात, असा दावा केला. यासोबतच नवाब मलिक यांनी समीर वानखेडेवर फसवणुकीच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोपही केला. मात्र, नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी