Nawab Malik यांचे समीर वानखेडेंवर गंभीर आरोप, Maldivesमधून झाली वसुली, कुटुंबांतील सदस्य उपस्थित, फोटो शेअर 

Nawab Malik's allegations on Sameer Wankhede । कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. 

Nawab Malik's serious allegations against Sameer Wankhede recovery from Maldives family members present photo shared
Nawab Malik यांचे समीर वानखेडेंवर गंभीर आरोप 
थोडं पण कामाचं
  • कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती
  • समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते
  • असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. 

Nawab Malik's allegations on Sameer Wankhede ।  मुंबई :  कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव (Maldives) आणि दुबईमध्ये (Dubai) होती त्यावेळी समीर वानखेडे (Sameer Wankhede ) यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. 

दरम्यान मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते याचे पुरावे नवाब मलिक यांनी सादर केले आहेत. 

समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का याचं उत्तर अपेक्षित आहे असेही नवाब मलिक म्हणाले. 


सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले असे सांगतानाच ही सर्व वसुली मालदीव व दुबईमध्ये झालीय असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी