NCB forms SIT ड्रग प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय लागेबांधे तपासणार एनसीबी एसआयटी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 06, 2021 | 11:51 IST

NCB forms SIT for Aryan Khan, Sameer Khan and Armaan Kohli आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचा तसेच ड्रग पार्टी प्रकरणातील इतर आरोपी, अभिनेता अरमान कोहली, नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्याशी संबंधित ड्रग केस तसेच अन्य तीन ड्रग केसचा तपास एनसीबीची एसआयटी करेल.

NCB forms SIT for Aryan Khan, Sameer Khan and Armaan Kohli
ड्रग प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय लागेबांधे तपासणार एनसीबी एसआयटी 
थोडं पण कामाचं
  • ड्रग प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय लागेबांधे तपासणार एनसीबी एसआयटी
  • सहा केसचा तपास करणार एसआयटी
  • एसआयटी एनसीबी मुंबईच्या टीमला भेटून आतापर्यंतच्या तपासाची माहिती घेणार

NCB forms SIT for Aryan Khan, Sameer Khan and Armaan Kohli । मुंबईः ड्रग प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय लागेबांधे तपासण्यासाठी एनसीबीने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) एसआयटीची (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम) स्थापना केली आहे. दिल्लीतल्या एनसीबी मुख्यालयातून एसआयटी काम करणार आहे. ड्रग पार्टी प्रकरणातील प्रमुख आरोपी आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचा तसेच या प्रकरणाशी संबंधित ड्रग पेडलर आणि इतर आरोपींना चौकशीसाठी दिल्लीत बोलावले जाण्याची शक्यता आहे. अभिनेता अरमान कोहली आणि महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्याशी संबंधित ड्रग केस तसेच अन्य तीन ड्रग केस अशा सहा प्रकरणांचा पुढील तपास आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई एसआयटी करेल.

एनसीबी मुंबई विभागीय कार्यालयाकडे असलेल्या सहा केस आंतरराष्ट्रीय लागेबांधे तपासण्यासाठी एसआयटीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला आहे. एसआयटीचे नेतृत्व ओडिशा कॅडरचे आयपीएस अधिकारी संजय सिंह करणार आहेत. ते एनसीबीच्या ऑपरेशन्स विभागाचे डेप्युटी डायरेक्टर जनरल अर्थात उप महासंचालक आहेत. 

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना समीर वानखेडे यांनी त्यांच्या मागणीनंतरच दिल्लीतून एसआयटी स्थापनेची प्रक्रिया झाल्याची माहिती दिली. मी रिट याचिका करुन ही मागणी केली, असेही ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय लागेबांधे तपासण्यासाठी थेट मुख्यालयाच्या नियंत्रणातील अनुभवी अधिकाऱ्यांचे पथक आवश्यक आहे. इथून पुढे एसआयटीला सहा केससाठी एनसीबी मुंबई पूर्ण सहकार्य करेल, असे वानखेडे म्हणाले. एसआयटी शनिवार ६ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबईत समीर वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भेटून आतापर्यंतच्या तपासाची माहिती घेणार असल्याचे समजते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी