Sameer Wankhede Wealth : एकूण किती संपती आहे समीर वानखेडेंकडे, जमीन, फ्लॅट पाहा संपूर्ण माहिती...  

Sameer Wankhede Total Wealth । कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कारवाई करणारे NCB चे मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे (Sameer wankhede) सध्या वादात सापडले आहेत. समीर वानखेडे यांच्या एकूण संपत्तीची (Property) माहिती सुद्धा समोर आली आहे. जाणून घ्या संपूर्ण संपत्तीची माहिती... (ncb officer sameer wankhedes total property details)

ncb officer sameer wankhedes total property details
Sameer Wankhede Wealth : एकूण किती संपती आहे समीर वानखेडेंची 

Sameer Wankhede Total Wealth । मुंबई: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कारवाई करणारे NCB चे मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे (Sameer wankhede) सध्या वादात सापडले आहेत. त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ncp) आणि प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) दररोज गंभीर आरोप करत आहेत. समीर वानखेडे यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आहे.   ते महागडे कपडे,  घड्याळे वापरत असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. या आरोपांना वानखेडे कुटुंबीयांनी वेळोवेळी उत्तर दिली आहेत. पण त्याचवेळी समीर वानखेडे यांच्या एकूण संपत्तीची (Property) माहिती सुद्धा समोर आली आहे. जाणून घ्या संपूर्ण संपत्तीची माहिती... (ncb officer sameer wankhedes total property details)

समीर वानखेडे यांच्या संपत्तीची माहिती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे दरवर्षी त्यांच्या मालमत्तेची माहिती संबधित एनसीबीसमोर नियमानुसार सादर करतात.

संपूर्ण  यादी

 1. समीर वानखेडे यांच्याकडे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात 4 एकर जमीन आहे (ही मालमत्ता त्यांच्या वडिलांची आहे.)
 2. 2004 मध्ये वानखेडेची आई जाहिदा वानखेडे यांनी समीर वानखडे यांना (मुंबईत) यांच्या नावे 800 चौरस फुटांचे घर दिले.
 3. आई जाहिदा वानखेडे यांच्या नावावर एक फ्लॅट नवी मुंबईत आहे, जो 1999 साली घेतला होता. (हा फ्लॅट सुमारे 700 चौरस फूट आहे)
 4. समीरच्या मावशीचा कर्करोगाने मृत्यू झाला होता, त्यांना मुलबाळ नाही, त्यामुळे त्यांनी त्यांचे सुमारे 1000 चौरस फुटांचे अंधेरीतील कार्यालय समीर वानखेडे (मुंबईत) यांना दिले.
 5. नवी मुंबईत एक भूखंड आहे जो भाड्याने देण्यात आला आहे, हा भूखंड 1995 मध्ये घेण्यात आला असून तो सुमारे 1100 चौरस फूट आहे.
 6. समीर वानखेडे यांनी 2016 मध्ये सुमारे 1100 चौरस फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट घेण्यासाठी पैसे कुठून आले? क्रांती रेडकर यांनी त्यांचा म्हाडाचा फ्लॅट विकला. वडिलांच्या पेन्शनचे पैसे आईच्या मृत्यूनंतर एलआयसीचे पैसे मिळाले आणि 2016 ते 2021 पर्यंतच्या पगाराचा काही भाग.
 7. याशिवाय नवाब मलिक यांनी सांगितलेले घड्याळ (सीमास्टर) त्यांच्या आईने 2005 साली सुमारे 55000 रुपयांना विकत घेतले आणि समीर वानखेडे यांना भेट म्हणून दिले. त्यावेळी समीर वानखेडे यांची पहिली सरकारी नोकरी केंद्रीय पोलीस संघटनेची होती.
 8. शूज आणि कपड्यांबद्दल बोलायचे झाले तर, ही सर्व खरेदी अंधेरी लोखंडवालाच्या सामान्य दुकानातून झाली आहे.
 9. जाहिदा वानखेडे कोण?
 10. जाहिदा वानखेडे या समीर वानखेडे यांच्या आई आहेत. ज्यांचे 2015 मध्ये निधन झाले, जाहिदा एक व्यापारी होत्या आणि त्यांचा भंगार व्यापाराचा व्यवसाय होता.
 11. समीर वानखडेच्या आईची आई दुर्गा यांच्या नावाने एक एनजीओ होती तसेच याशिवाय त्या अनाथालय ही चालवत होत्या
 12. समीर वानखेडेंचे आजोबा म्हणजेच के जाहिदा वानखेडे यांचे वडील हरियाणातील मुरथल येथील आहेत आणि ते सुद्धा राजघराण्यातील होते, आणि समीर वानखेडे यांची आजी सुरतची आहे, ती देखील खूप श्रीमंत कुटुंबातील होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी