Yasmeen Wankhede complaint against Nawab Malik यास्मीन वानखेडेंनी नवाब मलिकांविरोधात केली तक्रार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 28, 2021 | 01:05 IST

एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांची बहीण यास्मीन वानखेडे यांनी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली

Yasmeen Wankhede filed a police complaint against Nawab Malik
यास्मीन वानखेडेंनी नवाब मलिकांविरोधात केली तक्रार 
थोडं पण कामाचं
  • यास्मीन वानखेडेंनी नवाब मलिकांविरोधात केली तक्रार
  • नवाब मलिक यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
  • नवाब मलिक यांच्या विरोधात एक पत्र राष्ट्रीय महिला आयोगाला पाठवले

मुंबईः एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांची बहीण यास्मीन वानखेडे यांनी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. तसेच यास्मीन वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात एक पत्र राष्ट्रीय महिला आयोगाला पाठवले आहे. महिला म्हणून माझ्या अधिकारांचे रक्षण व्हावे अशी मागणी यास्मीन वानखेडे यांनी केली आहे. NCB Sameer Wankhede's sister Yasmeen Wankhede writes to National Commission for Women and filed a police complaint against Maharashtra minister Nawab Malik

याआधी एनसीबीने साक्षीदार प्रभाकर याच्या आरोपांची दखल घेऊन समीर वानखेडे यांची चार तास चौकशी केली. मुंबईत झालेल्या या चौकशीसाठी दिल्लीहून एनसीबीच्या पाच सदस्यांचे पथक आले होते. एनसीबीच्या प्रश्नांना समीर वानखेडे यांनी उत्तरे दिली. तसेच समीर वानखेडे यांनी उत्तरांना पूरक माहिती म्हणून कागदपत्रांच्या स्वरुपात नोंदी सादर केल्या. 

प्रभाकर यांनी एनसीबीच्या कारवाईत पंच म्हणून काम केलेल्या किरण व्ही गोसावी यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. मात्र किरण यांनी आरोप फेटाळले. एनसीबीने आरोपांची शहानिशा करण्यासाठी प्रभाकर आणि किरण गोसावी या दोघांनाही चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस बजावली आहे. मात्र अद्याप दोघेही चौकशीला आलेले नाही. यामुळे मीडियाच्या माध्यमातून एनसीबीने प्रभाकर आणि किरण गोसावी या दोघांना चौकशीला हजर होण्याचे आवाहन केले आहे. समीर वानखेडे यांनी चौकशी पथकाला सहकार्य केले असे सांगत ड्रग पार्टी केस प्रकरण यापुढेही समीर वानखेडे बघतील असे एनसीबीकडून जाहीर करण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी