NCB SIT ने आर्यन खानसह ७ जणांना बजावले समन्स

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 07, 2021 | 18:37 IST

NCB SIT summoned Aryan Khan for questioning in connection with drugs-on-cruise-case एनसीबीच्या एसआयटीने आर्यन खान, अरबाझ मर्चंट, अचित कुमार या तिघांसह एकूण सात जणांना समन्स बजावले आहे. चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले आहे.

NCB SIT summoned Aryan Khan for questioning in connection with drugs-on-cruise-case
NCB SIT ने आर्यन खानसह ७ जणांना बजावले समन्स 
थोडं पण कामाचं
  • NCB SIT ने आर्यन खानसह ७ जणांना बजावले समन्स
  • आर्यन खान, अरबाझ मर्चंट, अचित कुमार या तिघांसह एकूण सात जणांना समन्स बजावले
  • आर्यनने चौकशीला हजर होण्यासाठी वेळ मागितला

NCB SIT summoned Aryan Khan for questioning in connection with drugs-on-cruise-case मुंबईः एनसीबीच्या एसआयटीने एनसीबीच्या मुंबई कार्यालयाकडून सहा प्रकरणांशी संबंधित माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून एनसीबीच्या एसआयटीने आर्यन खान, अरबाझ मर्चंट, अचित कुमार या तिघांसह एकूण सात जणांना समन्स बजावले आहे. चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा असलेल्या आर्यन खान याला ड्रग पार्टी प्रकरणात एक प्रमुख आरोप असल्यामुळे एनसीबीच्या एसआयटीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. आर्यनने चौकशीला हजर होण्यासाठी वेळ मागितला आहे. 

ड्रग प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय लागेबांधे तपासण्यासाठी एनसीबीने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) एसआयटीची (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम) स्थापना केली आहे. सध्या एसआयटीचे पथक मुंबईत आहे. 

एसआयटी ड्रग पार्टी प्रकरणात प्रमुख आरोपी आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचा तसेच या प्रकरणाशी संबंधित ड्रग पेडलर आणि इतर आरोपींची चौकशी करण्याची शक्यता आहे. अभिनेता अरमान कोहली आणि महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्याशी संबंधित ड्रग केस तसेच अन्य तीन ड्रग केस अशा सहा प्रकरणांचा पुढील तपास आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई एसआयटी करेल.

एसआयटीचे नेतृत्व ओडिशा कॅडरचे आयपीएस अधिकारी संजय सिंह करत आहेत. ते एनसीबीच्या ऑपरेशन्स विभागाचे डेप्युटी डायरेक्टर जनरल अर्थात उप महासंचालक आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी