"राष्ट्रवादीतला एक मोठा नेता लवकरच अनिल देशमुख, नवाब मलिकांना भेटणार", Mohit Kamboj यांचं खळबळजनक ट्विट

मुंबई
सुनिल देसले
Updated Aug 16, 2022 | 22:57 IST

Mohit Kamboj said I will exposing NCP Big Leader soon: राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याबाबत गौप्यस्फोट करणार असल्याचं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे.

NCP big leader will meet nawab malik and Anil deshmukh soon tweeted by BJP Mohit kamboj bharatiya
"राष्ट्रवादीतला एक मोठा नेता लवकरच अनिल देशमुख, नवाब मलिकांना भेटणार", Mohit Kamboj यांचं खळबळजनक ट्विट 
थोडं पण कामाचं
  • "राष्ट्रवादीतला एक मोठा नेता लवकरच अनिल देशमुख, नवाब मलिकांना भेटणार"
  • लवकरच पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार
  • भाजप नेते मोहित कंबोज यांचं खळबळजनक ट्विट 

Mohit Kamboj tweet: भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका मोठ्या नेत्याबाबत गौप्यस्फोट करणार आहोत आणि त्यासाठी एक पत्रकार परिषद घेईल असं ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलं आहे. (NCP big leader will meet nawab malik and Anil deshmukh soon tweeted by BJP Mohit kamboj bharatiya)

इतकंच नाही तर "राष्ट्रवादीतला एक मोठा नेता लवकरच अनिल देशमुख, नवाब मलिकांना भेटणार" असंही ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे. मोहित कंबोज यांनी केलेल्या या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच विविध चर्चांना उधाण आले आहे.

आपल्या ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी म्हटलं, "मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा पर्दाफाश करणार आहे."

यामध्ये भारत आणि परदेशातील मालमत्तेची यादी

बेनामी कंपन्या 

गर्लफ्रेंड्सच्या नावावर असलेली संपत्ती

मंत्री म्हणून विविध खात्यांत केलेला भ्रष्टाचार

कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी 

अधिक वाचा : Maharashtra: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारचं मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ

राष्ट्रवादी काँग्रेसचा तो नेता कोण? 

भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या या ट्विटमुळे चर्चांना उधाण आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तो बडा नेता कोण? असाही सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

काही दिवसांपूर्वी मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेत आरोप केले होते. इतकेच नाही तर नवाब मलिक यांच्याकडून झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहितीही मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केली होती. त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अटकही झाली आणि अद्यापही नवाब मलिक हे अटकेतच आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी