शरद पवारांची कोणाला अॅलर्जी असल्याचे काम नाही - छगन भुजबळ   

. गोपीचंद पडळकर यांनीही अशी टीका केली होती. त्याला  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. पवार साहेबांची एलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही.

ncp chhagan bhujabl bjp gopichand padalkar ram kadam sharad pawar st strike political news in marathi
शरद पवारांची कोणाला अॅलर्जी असल्याचे काम नाही  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • . गोपीचंद पडळकर यांनीही अशी टीका केली होती.
  • पवार साहेबांची एलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही.
  • त्याला  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर दिले आहे.

नाशिक :  एसटी कामगारांच्या संपात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भाजपकडून त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले जात आहे. गोपीचंद पडळकर यांनीही अशी टीका केली होती. त्याला  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. पवार साहेबांची एलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही. 

छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बातचित केली त्यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर आपले मत व्यक्त केले पाहा त्याचे ठळक मुद्दे. 

 


गोपीचंद पडळकरांना फटकारले

- पवार साहेबांची एलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही
- ज्यांच्या मताला आणि अनुभवला किंमत आहे असे फक्त  शरद पवार आहेत
- प्रश्न सुटत नसतील, तर मविआ ची प्रश्न सोडवण्याची सामूहिक जवाबदारी
- पवार साहेब राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आहेत
- त्यांना लोकांच्या संबंधात काळजी वाटण स्वाभाविक आहे
- गिरणी कामगारांचा संप अजून संपला अस कोणी जाहीर केलेला नाही
- त्यामुळे मिल मधील।लोक देशोधडीला लागले
- एवढा अट्टाहास करणं योग्य नाही
- कामगारांना समजावून सांगणे हे पवार साहेबांचे काम

महापालिका निवडणूक आघाडीची भुजबळांची इच्छा पण...

- शक्यतो मविआचे सर्वोच्च नेते यांच मत एकत्र निवडणूक लढण्याची
- काही पक्ष सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत
- आम्ही स्थानिक नेत्यांना बैठक घेऊन तयारी करण्याच्या सूचना केल्या
- सगळे मतदार संघ लढवण्याच्या दृष्टीने आपली तयारी पाहिजे आशा सूचना
- *मविआ चे जे पक्ष सन्मानाने आमच्या सोबत बसतील आणि चर्चा करतील त्यांच्याशी चर्चा करून कोणा सोबत जायचं ते बघू
- आम्ही आमचे दरवाजे उघडे ठेवले आहेत
- एकनाथ शिंदे यांनी देखील एकत्र लढण्याबाबत विचारणा केली
- आम्ही आमची तयारी असल्याचे सांगितले
- सगळीकडे तयारी करून गरजेचं आहे

काँग्रेस स्वबळाची नाऱ्या भुजबळांचे मत 

- कुणाला वाटत असेल स्वबळावर जावं तर तो त्यांचा प्रश्न
- नाही झालं तर निवडणुकीनंतर एकत्र येता येईल

 गिरीश महाजन यांच्यावर नो कमेंट 

- किती आणि कसले पुरावे मिळाले मला माहिती नाही
- लॉ विल टेक इट्स कोर्स

उत्तरप्रदेश,गोवा निवडणुकीवर भुजबळांचे मत 

- काही गोदी मीडियातील लोक सांगतात
- आमच्या मतदार संघात किती मत मिळतील हे सांगणे सुद्धा कठीण असत
- शेतकरी आंदोलन, बेकारी, महागाई असे मुद्दे असताना भाजपला यश मिळेल असा वाटत नाही
-लोकांना देव धर्म पाहिजे असतो, मात्र रोजी रोटी देखील महत्वाची आहे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी