Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण, ट्विटवरून दिली माहिती

Sharad pawar corona positive राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. पवार यांनी ट्विटवरून ही माहिती दिली आहे.

sharad pawar
शरद पवार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शरद पवार यांना कोरोनाची लागण
  • ट्विटवरून ही माहिती दिली आहे.
  • आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे

Sharad Pawar : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. पवार यांनी ट्विटवरून ही माहिती दिली आहे. पवार यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. असे पवार म्हणाले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. (NCP chief mp sharad pawar corona positive )

व्यंकया नायडू यांना कोरोनाची लागण

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू  यांना कोरोनाची लागण झाली आहे. नायडू सध्या हैद्राबादमध्ये असून कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते एक आठवड्यासाठी आयसोलेट झाले आहेत. जे जे नायडू यांच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

सहा केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह सहा केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ, पराराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांना चार जानेवारी कोरोनाची लागण झाली होती. २ जानेवारीपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करावी असे आवाहन त्यांनी केले होते. तर केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनाही कोरोनाची लागण झाली होते. केरळच्या कझीकोडे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 


काही दिवसांपूर्वी संसदेतील ४०० कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. ४ ते ८ जानेवारीदरम्यान राज्यसभा सचिवालयायाच्या ६५, लोकसभा सचिवालयाचे २०० आणि इतर सेवेतील १३३ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकैय्या नायडू यांनी महासचिव पीसी मोदी आणि सल्लागार डॉ.पीपी रामाचार्युलू यांच्याशी चर्चा केली होती. नायडू यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले असून त्यांच्यावर निगराणी ठेवण्याचे निर्देश दिले होते. वेळ पडली तर कर्मचार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्यास मदत करावी असेही नायडू यांनी म्हटले होते. सर्व कर्मचार्‍यांना कोरोनासंबंधित नियम पाळण्याचे आदेश देण्यात आले होते. जे लोक कोरोना बाधितांच्या संपर्कात आले आहेत त्यांना आयसोलेट होण्याचा सल्ला देण्यात आला होता. लोकसभा आणि राज्यसभेचे अनेक अधिकारीही सध्या आयसोलेशनमध्ये होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी