Sharad Pawar : मुंबई : शासकीय व्यासपीठावर विरोधी पक्षांवर टीका करणे हे चुकीचे आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. तसेच पंतप्रधान मोदींचे भाषण एका राजकीय पक्षाच्या नेत्यासारखे होते असेही पवार म्हणाले. आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा पार पाडला त्यावेळी ते बोलत होते. (ncp chief sharad pawar criticized pm narendra modi over samruddhi highway speech)
पवार म्हणाले की, मी पंडित नेहरुंपासून अनेक पंतप्रधान पाहिले. पंडित नेहरु यांचे भाषण मी प्रत्यक्ष ऐकले होते. नेहरु निवडणुकीच्या सभेतही कधी विरोधी पक्षांवर टीका करायचे नाही परंतु सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शासकीय व्यासपीठावरून विरोधी पक्षांवर टिका करत आहेत. हे कितपत योग्य आहे हे विचार करण्याची वेळ आली आहे. विरोधी पक्षनेते हे लोकशाहीचा भाग आहे. देशाच्या आजवच्या सर्व पंतप्रधानांनी याची काळजी घेतली परंतु सध्या हे होत नाही असेही पवार म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.