राष्ट्रवादीने विधानपरिषदेसाठी उमेदवार केले निश्चित?

महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी उमेदवारांची निश्चिती केली आहे. त्यामुळे या बाबतची घोषणा लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

NCP Finalize list of MLC candidate for Governor nominated 12 seats
राष्ट्रवादीने विधानपरिषदेसाठी उमेदवार केले निश्चित?  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी उमेदवारांची निश्चिती केली आहे.
  • या संदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या (बुधवारी) आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
  • राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी ४ जागा राष्ट्रवादीच्या  कोट्यात आल्याने राष्ट्रवादीकडून या जागांवर कोणाला संधी दिली जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी उमेदवारांची निश्चिती केली आहे. त्यामुळे या बाबतची घोषणा लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

या संदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या (बुधवारी) आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी ४ जागा राष्ट्रवादीच्या  कोट्यात आल्याने राष्ट्रवादीकडून या जागांवर कोणाला संधी दिली जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. 

भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडे येत्या १७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे यातील एका जागेवर त्यांची वर्णी लागू शकते. तर उरलेल्या तीन जागी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांनी संधी मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

यापैकी आनंद शिंदे आणि राजू शेट्टी यांच्या नावाची पूर्वीपासूनच चर्चा होती. काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भेट घेतली होती. तसेच विधान परिषदेसाठी राजू शेट्टी यांचे नाव गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत होते.  राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे असले तरी  राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राजू शेट्टी यांच्या नावाची शिफारस केली जाणार आहे.

नाथाभाऊंच ठरलं! १७ तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश? विधानपरिषदही मिळणार?

 गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (bjp leader ekanath khadase) हे भारतीय जनता पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र ती चर्चा आता खरी ठरताना दिसत आहे. एकनाथ खडसे लवकरच भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत (ncp) प्रवेश करणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांद्वारे मिळत आहे. खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा जवळपास निश्चित समजला जात आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील अनेक आजी-माजी आमदार (mla) आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादी प्रवेश करण्याची शक्यता आहे.

१७ तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?

दरम्यान, एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये प्रवेश कधी करायचा या विषयावर एक बैठक पार पडली आहे. या बैठकीला एकनाथ खडसे यांचे समर्थक आणि शिवसेनेचे काही कार्यकर्ते देखील उपस्थितीत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या बैठकीत येत्या १७ तारखेला घटस्थापनेला राष्ट्रवादीत प्रवेश करायचा असं ठरल्याची शक्यता आहे. सदर माहिती धुळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी