NCP : महाविकास आघाडी सरकारमध्ये विकासनिधी मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 17, 2021 | 17:55 IST

NCP is leading in getting development funds in Mahavikas Aghadi government : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये विकासनिधी मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. विकासनिधी मिळवण्याच्या बाबतीत काँग्रेस पक्ष दुसऱ्या आणि शिवसेना तिसऱ्या स्थानी आहे.

NCP is leading in getting development funds in Mahavikas Aghadi government
महाविकास आघाडी सरकारमध्ये विकासनिधी मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर 
थोडं पण कामाचं
  • महाविकास आघाडी सरकारमध्ये विकासनिधी मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर
  • विकासनिधी मिळवण्याच्या बाबतीत काँग्रेस पक्ष दुसऱ्या आणि शिवसेना तिसऱ्या स्थानी
  • शिवसेनेच्या तुलनेत चौप्पट विकासनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला

NCP is leading in getting development funds in Mahavikas Aghadi government : नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये विकासनिधी मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. विकासनिधी मिळवण्याच्या बाबतीत काँग्रेस पक्ष दुसऱ्या आणि शिवसेना तिसऱ्या स्थानी आहे. मुख्यमंत्री पद आणि सर्वाधिक आमदार असूनही शिवसेनेच्या वाट्याला दोन्ही काँग्रेसच्या तुलनेत कमी विकासनिधी आला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक ५९ आमदार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ आणि काँग्रेसचे ४३ आमदार आहेत. पण जास्त विकासनिधी मिळवून विकास योजना राबवण्याच्या बाबतीत सहकारी पक्षांच्या तुलनेत शिवसेना पुरती पिछाडीवर दिसत आहे. 

किमान समान कार्यक्रम ठरवून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. पण सत्ता स्थापन झाल्यापासून शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्व वाढले आहे. शिवसेना सत्तेत असूनही दोन्ही काँग्रेसच्या तुलनेत मागे पडत असल्याचे चित्र आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पद आणि ५९ आमदार असूनही शिवसेनेच्या वाट्याला सर्वात कमी ५२ हजार २५५ कोटी रुपयांचा विकास निधीच आला आहे. या उलट ४३ आमदार असलेल्या काँग्रेसच्या वाट्याला १ लाख २४ कोटी रुपयांचा विकास निधी आला आहे. तसेच ५३ आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला सर्वाधिक २ लाख २४ हजार ४११ कोटी रुपयांचा विकास निधी आला आहे.

शिवसेनेच्या तुलनेत चौप्पट विकासनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्या विभागाकडून शिवसेनेच्या आमदारांना दोन्ही काँग्रेसच्या आमदारांच्या तुलनेत कमी महत्त्व दिले जात आहे. 

महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विभागासाठी ४२० कोटी रुपयांची तरतूद आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत फक्त तीन टक्के म्हणजेच १४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या खात्याची अवस्था एवढी वाईट आहे. शिवसेनेच्या इतर आमदारांकडे राज्याच्या अर्थ मंत्रालयाकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. विकासनिधीचे वाटप करताना भेदभाव सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला आहे. एरवी आक्रमक दिसणारी शिवसेना सत्ता राखताना विकासनिधीच्या मुद्यावर मवाळ झाल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी