Angry Ajit Pawar: मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडीचं विधेयक आज विधानसभेत संमत करण्यात आलं. या विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केला. यावेळी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी भाषण करताना सरकारचा खरपूस समाचार घेतला. याचवेळी निधीबाबत बोलताना भाजपच्या एका आमदारने त्यांच्या भाषणात आडकाठी करताच अजित पवार हे प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळालं. (ncp leader ajit pawar got angry with bjp mla in the assembly)
'मी अर्थमंत्री असताना जो निधी देत होतो तेव्हा आम्ही महाविकास आघाडीतील आमदारांना ५-५ कोटी दिला हे मी मान्य करतो. परंतु त्याच वेळेस तुमच्याकडून याद्या घेऊन आम्ही तुमच्याही आमदारांना दोन-दोन कोटी रुपयांचा निधी..' (एक कोटी.. एक कोटी.. भाजप आमदारांचा गोंधळ)
'थांबा.. थांबा.. एक मिनिट.. मघाशीच सांगितलं आहे तुम्हाला जे बोलायचं आहे ते नंतर उठून बोला. त्यासंदर्भात... अरे थांब ना बाबा.. तुलाच फार कळतंय का? काय आम्ही इथे गोट्या खेळायला आलोय का?' असा संतप्त सवाल अजित पवारांनी भाजप आमदाराला केला.
पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले:
'उपमुख्यमंत्री महोदय आपल्याला आताच आपल्या पक्षाने केंद्राच्या स्तरावर एका महत्त्वाच्या कमिटीवर नेमलेलं आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. कुणी राष्ट्रीय पातळीवर जावं. यशवंतराव चव्हाण साहेब जेव्हा दिल्लीला गेले त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते झाले. तिच गोष्ट पवार साहेबांबाबत घडली. तिच गोष्ट नितीन गडकरींच्या बाबतीत घडली. तिच गोष्ट आपल्या बाबतीत घडावी अशा माझ्या शुभेच्छा आहेत. परंतु देवेंद्रजी मला तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे की, आपण मनाचा मोठेपणा दाखवा. मागचा काळात २५/१५ चं काम या नेत्यांच्या सुपीक डोक्यातून आली. त्याचा वापर मी देखील मोठ्या प्रमाणावर करुन घेतला.'
'अरे थांब ना बाबा.. तुलाच फार कळतंय का? काय आम्ही इथे गोट्या खेळायला आलोय का?'
'हा निधी देत असताना आम्ही महाविकास आघाडीतील आमदारांना ५-५ कोटी दिला हे मी मान्य करतो. परंतु त्याच वेळेस तुमच्याकडून याद्या घेऊन आम्ही तुमच्याही आमदारांना दोन-दोन कोटी रुपयांचा निधी..' (एक कोटी.. एक कोटी.. भाजप आमदारांचा गोंधळ)
'थांबा.. थांबा.. एक मिनिट.. मघाशीच सांगितलं आहे तुम्हाला जे बोलायचं आहे ते नंतर उठून बोला. त्यासंदर्भात... अरे थांब ना बाबा.. तुलाच फार कळतंय का? काय आम्ही इथे गोट्या खेळायला आलोय का?' असं म्हणत अजित पवारांनी आपला संताप लागलीच व्यक्त केला.
'देवेंद्रजी आपण मनाचा मोठेपणा दाखवावा'
'देवेंद्रजींना त्यावेळेस सांगितलं होतं की, आम्ही दोन-दोन कोटी आमदारांना देऊ. दोन कोटी दिले नाही आम्ही एक कोटी दिले. परंतु एक सुरुवात केली.'
'देवेंद्रजी आपण मनाचा मोठेपणा दाखवावा. मी मुख्यमंत्र्यांना बोललो तर मुख्यमंत्री आपलं नाव सांगतात. आपल्याला सांगितलं तर आपण मुख्यमंत्र्यांचं नाव सांगतात. तसं करु नका. माझी आपल्याला खरोखरीच विनंती आहे. शेवटी आज आपण तिथे बसलेले आहात उद्या आणखी जो कोणी १४५ आमदार गोळा करेल. त्यामुळे कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतं.' असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
अधिक वाचा: Uddhav Thackeray : होय.. मातोश्रीवरही खोके येतायत, पण... उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले
'देवेंद्रजी तुम्ही काय भाजपचे उपमुख्यमंत्री नाही...'
'देवेंद्रजी आपण आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात. तुम्ही काय आता भाजपचे उपमुख्यमंत्री नाहीत. किंवा ती व्यक्ती फक्त शिवसेना शिंदे गटाची मुख्यमंत्री नाही. संपूर्ण राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आहात. अजूनही वेळ गेली नाही. त्यामुळे तुम्ही ठरवलं तर इतर आमदारांना निधी देऊ शकता.' अशी सूचनाही अजित पवारांनी केली.
'एका उपमुख्यमंत्र्याने सांगितलंच कसा महाराष्ट्रात पक्ष फोडला...'
'तुम्ही ठरवलं तर काहीही करु शकता हे वर्षभर आम्हाला लक्षात आलं आहे. म्हणजे बसून बसून भुंगा कसा हळूहळू लागला हे कुणाला कळलाच नाही. त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की, आमचा काय दोष नाही.. आमचा काय दोष नाही. आमचा काही संबंध नाही... पण या देशातील एका महत्त्वाच्या भाजपच्या नेत्याने एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यानीच जाहीर केलं की, आम्ही महाराष्ट्रामध्ये तो पक्ष फोडून दाखवला. असं स्टेटमेंट आलं.' असं म्हणत अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
अधिक वाचा: MNS: माझ्या नवऱ्याच्या हातात जेव्हा सत्ता येईल तेव्हाच रस्ते चांगले होतील: शर्मिला ठाकरे
'गिरीश महाजन साहेब.. या वेळेस ग्रामविकासवर कसं तरी निभावलं नाहीतर...'
'गिरीश महाजनजी. मला त्या खोलात जायचं नाही. महाजन साहेब हे असं काही करु नका.. तुम्ही आहात जवळचे. तरी या वेळेस ग्रामविकासवर कसं तरी निभावलं हे लक्षात घ्या. नाही तर झटका फार जोरात होता.' अशा शब्दात अजित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांना कोपरखळी लगावली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.