Ketaki Chitale : मुंबई : सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक अशी वादग्रस्त पोस्ट केतकी चितळेने शरद पवार यांच्याविरोधात पोस्ट केली आहे. त्यामुळे राज्यात एकच वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते केतकीच्या विरोधात आक्रमक झाले असून त्यांनी केतकीवर टीका केली आहे. तसेच ठाण्यात केतकीविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
केतकी चितळे हिने आपल्या फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. त्यात पवारांची नरकात जायची वेळ आली असून त्यांच्या कर्करोगावरही अश्लाघ्य शब्दात टिप्पणी केली आहे. ऍडव्होकेट नितीन भावे नावाच्या माणसाची ही मूळ पोस्ट त्यांच्या नावाने केतकीने ही पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. केतकीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,
तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
केतकीच्या या पोस्टमुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चिडले आहेत. ट्विटर आणि फेसबुकवर केतकी चितळेचा निषेध नोंदवला जात आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनीही केतकी चितळेवर टीका केली आहे. केतकी छपरी असून तिला चपलेने मारले पाहिजे, ही विकृती असून केतकी मनोरुग्ण असल्याचेही ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प्रवक्त्या सक्षणा सलगार यांनीही केतकीवर टीका केली आहे. केतकीला कोणी कुत्रंही ओळखत नाही आणि प्रसिद्धिसाठी केतकी हे सगळे करत असल्याचे सक्षणा यांनी म्हटले आहे.
केतकीच्या या वादग्रस्त पोस्टविरोधात ठाण्यातील कळवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी केतकीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी पुण्याती सासवड पोलीस स्थानकात केतकी चितळेविरोधात तक्रार दाखल केली. तसेच पोलिसांनी केतकीविरोधात गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणीही केली आहे.
आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे च्या वतीने केतकी चितळे यांनी केलेल्या फेसबुक पोस्ट व त्या संबंधित असणार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घोलप साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.@supriya_sule @Vidyaspeak pic.twitter.com/mnl7fHRoD7
— Bharati Shewale (@BharatiShewale) May 14, 2022
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.