Jayant Patil : दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची टीका

गुजराती आणि राजस्थानींमुळे मुंबई आर्थिक राजधानी आहे असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्यावर ज्यांना दुसर्‍या राज्यांबद्दल प्रेम आहे त्यांनी खुशाल तिकडे जाऊन रहावे अशी टीका केली आहे.

Jayant Patil
जयंत पाटील  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गुजराती आणि राजस्थानींमुळे मुंबई आर्थिक राजधानी आहे असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे.
  • त्यावर ज्यांना दुसर्‍या राज्यांबद्दल प्रेम आहे त्यांनी खुशाल तिकडे जाऊन रहावे
  • अशी टीका राष्ट्रवादी जयंत पाटील यांनी केली आहे.

Jayant Patil : मुंबई : गुजराती (Gujarati Community) आणि राजस्थानींमुळे (Rajsthani Community) मुंबई (Mumbai) आर्थिक राजधानी (Financial Capital) आहे असे वादग्रस्त विधान (Controvesial Statement) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले आहे. त्यावर ज्यांना दुसर्‍या राज्यांबद्दल प्रेम आहे त्यांनी खुशाल तिकडे जाऊन रहावे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी केली आहे.  (ncp leader criticized governor jayant patil over mumbai remark)

अधिक वाचा : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शिंदे सरकारचे मंत्री शपथ घेणार, सूत्रांची माहिती

माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की,  परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून या राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावर सुनावले आहे. तसेच घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी अत्यंत जपून बोलण्याचा संकेत या देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये लगावला आहे.  महाराष्ट्राच्या राजधानीत पंचतारांकित व्यवस्थेत राहून महाराष्ट्रातील मराठी माणसांचा अपमान राज्यपाल महोदय करत आहेत. महाराष्ट्रातील भाजपाला हे विधान मान्य आहे का ? असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.  राज्यपाल मराठी माणूस, महाराष्ट्राचा गौरवशाली व जाज्वल्य इतिहास यांचा वारंवार का अपमान करत आहेत ? असा खडा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

अधिक वाचा :  धक्कादायक ! मलकापूरचा भोंदू महाराज विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकला, प्रसादात गुंगीचे औषध देत महिलेवर केला बलात्कार, वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

भाजप आमदार नितेश राणेंकडून पाठराखण

राज्यपाल कोश्यारींकडून केलेल्या वक्तव्याचा बहुतांश राजकीय पक्षांकडून निषेध नोंदवला जात आहे. अशा वेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी कोश्यांरींची पाठराखण केली आहे. तसेच यावरून शिवसेनेवर टीका केली आहे. नितेश राणे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, माननीय राज्यपालांकडून कुणाचाही अपमान झालेला नाही. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना मुंबई महानगरपालिकेची कंत्राटं दिली? असा सवाल करत तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात असेही राणे यांनी म्हटले आहे. तसेच तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदी कडे देऊन ठेवली आहे ते चालत का ? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही ?? असेही राणे म्हणाले आहेत. 

अधिक वाचा : Shiv Sena: शिंदे गटात जाणार की नाही याचा निर्णय उद्या सांगेन: अर्जुन खोतकर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी