Jitendra Awhad : मुंबई : मशीदीवरील भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र पेटवू नका असे आवाहन केले आहे. लोकांना श्रीराम म्हणायला लावा परंतु राम नाम सत्य है बोलायला लावू नका असेही आव्हाड म्हणाले आहेत.
राज ठाकरेंना माझी हात जोडून विनंती महाराष्ट्र पेटवू नका
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 4, 2022
कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागलंय.
त्यांच्या खिशात पैसे नाहीयत.गॅस पेट्रोल डिझेल महागलंय
भाज्या, केरोसिन महाग झालंय खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सर्वच महाग झालंय याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राज ठाकरेंना माझी हात जोडून विनंती महाराष्ट्र पेटवू नका. कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना आता काम मिळण्यास सुरूवात झाली आहे..सामान्य माणसांच्या खिशात पैसे नाहीत, गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच भाज्या, केरोसिन महाग झाले आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सर्वच महाग झाले याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत. श्रीराम जरूर म्हणा परंतु राम नाम सत्य है बोलायला लावू नका असेही आव्हाड म्हणाले.
शरद पवार साहेबांमुळे जातीपातीचं राजकारण वाढलं, असं म्हटलं जात आहे. मी स्वत: सुद्धा मागासवर्गीय समाजातून आलोय. आज मला आदरणीय पवार साहेबांसोबत काम करून ३५ वर्षे झाली. राजकीय पार्श्वभूमी नसून सुद्धा मी आज या राज्याचा गृहनिर्माण मंत्री आहे. @Awhadspeaks pic.twitter.com/OBGGeGs189
— NCP (@NCPspeaks) April 4, 2022
शरद पवार जातीयवादी नाहीत
मी स्वतः मागासवर्गीय आहे, आज शरद पवार यांच्यामुळे मी राज्याचा गृहनिर्माण मंत्री झालो असे आव्हाड म्हणाले. तसेच धनंजय मुडे अनेक वर्ष विरोधी पक्ष नेते होते, छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे आहेत. महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचे श्रेय हे शरद पवार यांचे आहे. मंडल आयोगाला त्यांनी पाठिंबा दिला होता. अन्यथा राज्यात मागासवर्गीय नेतृत्व पुढे आलं नसतं असेही आव्हाड म्हणाले.
त्यामुळे पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय बातम्यांमध्ये हेडलाईन होत नाही म्हणून लोक हमखास आपल्या भाषणांमध्ये पवार साहेबांचे नाव घेतात, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांवर टीका केली. आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
— NCP (@NCPspeaks) April 4, 2022
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.