Nawab Malik Vs Sameer Wankhede : समीर वानखेडेंना नवाब मलिकांचा सवाल, तुमची मेहुणीही ड्रग्स व्यवसायात आहे का? 

Nawab Malik Vs Sameer Wankhede : राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचे सत्र कायम ठेवले आहे. नवाब मलिकांच्या आरोपांवर आता समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया काय असणार आहे, हे पाहावे लागणार आहे. 

ncp leader nawab malik new tweet sameer wankhede sister in law involved in the drug business
तुमची मेहुणीही ड्रग्स व्यवसायात आहे का? वानखेडेंना सवाल 
थोडं पण कामाचं
  • नवाब मलिकांचा पुन्हा वानखेडेंवर निशाणा
  • ट्विट करत केला गंभीर आरोप
  • ट्विटरवर फोटो शेअर करत केला मोठा दावा

Nawab Malik Vs Sameer Wankhede । मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यातील आरोप - प्रत्यारोपांचे सत्र अजूनही थांबण्याचे नाव घेत दिसत नाही. मुंबई कोर्डिलिया क्रूझ प्रकरणी नवाब मलिकांनी अनेक खुलासे केले आहेत. तसंच, समीर वानखेडे यांना लक्ष्य करत खळबळजनक आरोप केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्या मेहुणी संदर्भात गंभीर आरोप केला आहे. (ncp leader nawab malik new tweet sameer wankhede sister in law involved in the drug business )

नवाब मलिकांनी आज आणखी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटसोबतच ई- कोर्ट सर्व्हिसवरील फोटो शेअर केले आहेत. समीर वानखेडे यांची मेहुणी ड्रग्स व्यवसायात गुंतलेली आहे का?, असा सवाल नवाब मलिकांनी उपस्थित केला आहे. तसंच, पुण्यातील कोर्टात तिच्या नावावरील केस प्रलंबित आहेत. त्यांचा समीर वानखेडेंशी काय संबंध याचा त्यांनी खुलासा करावा, असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे. तसेच, नवाब मलिकांनी ई- कोर्ट सर्व्हिसवरील फोटो शेअर करत हा पुरावा असल्याचा दावा करून पुन्हा एकदा खळबळ उडवू  दिली आहे. 

नवाब मलिकांच्या या ट्वीटनंतर प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत काही बोलण्यास नकार दिला. मी ट्वीट केले आहे त्यात मी स्पष्ट लिहलं आहे. एक प्रकरण पुण्याच्या कोर्टात प्रलंबित आहे. त्यांचा आणि समीर वानखेडे यांचा काय संबंध याचा त्यांनी खुलासा करावा, असं त्यांनी म्हटलं आहे.


नोटबंदीला पाच वर्ष पूर्ण

नवाब मलिकांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नोटबंदीच्या मुद्द्यावरुन त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 'आज नोटबंदीला पाच वर्ष पूर्ण झाले. ज्या दिवशी नोटबंदी केली होती तेव्हा मोदींनी म्हटलं होतं मला तीन महिन्यांची मुदत द्या. या पाच वर्षात काळा पैसा संपेल, भ्रष्टाचार, आतंकवाद कमी होईल. पण त्या उलट झालं नोटबंदीला पाच वर्ष झाली बेरोजगारी वाढली,' अशी टीका नवाब मलिकांनी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी