राज्यसभा निवडणुकीचा राष्ट्रवादीनं घेतला धसका; विधान परिषदेसाठी शरद पवारांनी नेत्यांना दिल्या 'या' सूचना

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 14, 2022 | 12:14 IST

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi Sarkar) चौथे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) पुरेसे संख्याबळ असतानाही पराभूत झाल्याची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (Nationalist Congress President ) शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतली आहे. कोणत्या कारणांमुळे राज्यसभेच्या निडवणुकीत पराभव झाला कुठे रणनिती अपयशी ठरली यासर्व गोष्टींवर राष्ट्रवादीकडून विचार-विमर्श चालू आहे. 

Take care for the Legislative Council, Sharad Pawar instructions to leaders
विधान परिषदेसाठी काळजी घ्या, शरद पवारांच्या नेत्यांना सूचना  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi Sarkar) चौथे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) पुरेसे संख्याबळ असतानाही पराभूत झाल्याची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (Nationalist Congress President ) शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतली आहे. कोणत्या कारणांमुळे राज्यसभेच्या निडवणुकीत पराभव झाला कुठे रणनिती अपयशी ठरली यासर्व गोष्टींवर राष्ट्रवादीकडून विचार-विमर्श चालू आहे. 

राज्यसभेच्या निकालाची कारणमीमांसा करण्यासाठी शरद पवारांनी सोमवारी दक्षिण मुंबईतील 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी 'राष्ट्रवादी'च्या निवडक नेत्यांची बैठक बोलावली होती. येत्या २० जूनला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अधिक काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी मंत्र्यांना दिल्याचे सूत्रांकडून समजते. 

राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराच्या पराभवाबाबत शरद पवार यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांकडून समजते. आघाडीकडे अपक्ष आमदारांची मते असताना अधिक काळजी न घेतल्यामुळे ती मते फुटली. विधान परिषद निवडणुकीआधी सोबत असलेल्या अपक्ष आमदारांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या मार्गी लावण्याच्या आणि राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व नेत्यांनी तयार राहण्याच्या सूचना पवार यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी या बैठकीस उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीआधी तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक घेण्याविषयी या वेळी चर्चा झाल्याचे समजते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी