MP Supriya Sule corona positive : खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण, पती सदानंद सुळे यांचीही टेस्ट पॉझिटिव्ह

mp supriya sule corona positive राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वतः ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

थोडं पण कामाचं
  • खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण
  • सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोनाची लागण
  • ट्विटरवरून दिली माहिती

MP Supriya Sule corona positive : मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वतः ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. सध्या संपूर्ण देशात ओमिक्रॉनचे संकट वाढत असताना महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. सुप्रिया सुळे यांच्यापूर्वी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. 

सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे की, माझी आणि सदानंद सुळे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही, जे जे आमच्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोरोना टेस्ट करावी आणि  काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. 


देशात ओमिक्रॉनचे संकट वाढत असून सध्या देशात ओमिक्रॉनचे ७८१ रुग्ण आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्यांची संख्या १६७ च्या घरात आहे. ओमिक्रॉनचे संकट आतापर्यंत देशातील २१ राज्यांत पोहोचले आहे. मुंबाईत सध्या कोरोना संक्रमणाचा दर ४ टक्के आहे. हा दर ५ टक्क्यांवर गेल्यास मुंबईत निर्बंध लावले जातील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी