नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात मागितली बिनशर्त माफी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 10, 2021 | 21:35 IST

ncp nawab malik apology in mumbai high court in sameer wankhede case महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली.

ncp nawab malik apology in mumbai high court in sameer wankhede case
नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात मागितली बिनशर्त माफी 
थोडं पण कामाचं
  • नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात मागितली बिनशर्त माफी
  • वानखेडे यांच्या संदर्भात जाहीरपणे कोणतेही मतप्रदर्शन करणार नाही, वक्तव्य करणार नाही - नवाब मलिख
  • नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी मानहानीचा दावा दाखल केला

ncp nawab malik apology in mumbai high court in sameer wankhede case मुंबईः महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली. यापुढे वानखेडे यांच्या संदर्भात जाहीरपणे कोणतेही मतप्रदर्शन करणार नाही, वक्तव्य करणार नाही; असे सांगत मलिक यांनी उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली.

केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांबाबत यापुढे कोणतेही विधान करणार नाही अशी हमी नवाब मलिक यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात दिली. 

नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणाचा निर्णय जाहीर होईपर्यंत वानखेडे कुटुंबीयांविरोधात कोणतेही मतप्रदर्शन करणार नाही, वक्तव्य करणार नाही; अशी लेखी हमी नवाब मलिक यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयाला दिली होती. या हमीचे नवाब मलिक यांनी उल्लंघन केले. ही बाब ज्ञानदेव यांच्या वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर नवाब मलिक मुंबईच्या उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी