राष्ट्रवादीचं ठरलं, या दोघांना पाठविणार विधान परिषदेवर

 येत्या २१ मे रोजी राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेची निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

ncp sharad pawar rupli chakankar amol mitkari shashikant shinde
राष्ट्रवादीचं ठरलं, या दोघांना पाठविणार विधान परिषदेवर  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • राष्ट्रवादीकडून अनेक जण होते इच्छूक रुपाली चाकणकर, राजन पाटील, महेश तपासेंची नावे मागे 
  • शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावं यापूर्वीच निश्चित झाली आहेत
  • अजूनही भाजपचे उमेदवार ठरायचे बाकी

मुंबई :  येत्या २१ मे रोजी राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेची निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झाले आहे.  राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांची नावं जवळपास निश्चित झाल्याचं कळतं आहे. महाविकासआघाडीत कोणा-कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सूकता आहे. त्यात विशेषतः राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीकडून शिदे आणि मिटकरी यांची नावे पुढे आली असली तरी लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे नाव मागे पडल्याचे समजते. नवीन चेहरे घेण्याची चर्चा असली तरी सोलापुरातून (Solapur) माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) आणि ठाणे (Thane) पट्ट्यातून महेश तपासे (Mahesh Tapase) आणि आशीष दामले (Ashish Damle) यांचेही नाव समोर आली होती. पण साताऱ्यात लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांना धूळ चारण्यात शशिकांत शिंदे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ते स्वतःची विधानसभेची जागा राखू शकले नाही. पण त्यांनी मोठी सातारा लोकसभा सीट निवडून आणल्याची मोठी कामगिरी केल्याची बक्षीस त्यांना मिळणार  आहे. तसेच अमोर मिटकरी यांनी शिवसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले होते. त्यामुळे त्यांच्याही कामाची दखल घेत त्यांना विधान परिषदेतवर 

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीची नावही निश्चित झाल्याचं कळतं आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावं यापूर्वीच निश्चित झाली आहेत तर आता काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार ठरायचे आहेत.

दुसरीकडे काँग्रेस २ जागांसाठी आग्रही असल्याचं देखील समोर आलं होतं. महाविकासआघाडीने सहावा उमेदवार देखील उभा करावा, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न सुरु असताना जर आता काँग्रेसने २ जागांसाठी हट्ट केला तर मग निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. सध्याचं संख्याबळ पाहता भाजपचे १०५ आमदार असल्यामुळे चौथी जागा त्यांना मिळू शकते. पण त्यासाठी त्यांना काही अपक्ष आमदारांची मदत घ्यावी लागेल. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी