NCRB Report : एनसीआरबीच्या अहवालात धक्कादायक आकडेवारी उघड , शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांच्या आत्महत्येत मोठी वाढ

ncrb reports more suicides among businessmen : एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, वर्ष २०२० मध्ये ११ हजार ७१६ व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. तर, याच कालावधीत एकूण १० हजार ६७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

ncrb reports more suicides among businessmen
एनसीआरबीच्या अहवालात धक्कादायक आकडेवारी उघड  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये उद्योजकांच्या आत्महत्यांमध्ये २९ टक्क्यांनी वाढ
  • २०२९ या वर्षी २९०६ एवढ्या व्यापाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत
  • आत्महत्या केलेल्या ११ हजार ७१६ व्यावसायिकांमध्ये ४३५६ व्यापारी

NCRB Report  । मुंबई : एनसीआरबीच्या अहवालात एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नापिकी आणि इतर कारणामुळे देशात आणि  राज्यात बरेच शेतकरी आत्महत्या करत असल्याच आपण पाहतो.  मात्र , कोरोना काळात शेतकऱ्यांपेक्षा जास्त आत्महत्या व्यापाऱ्यांनी केल्या असल्याचा धक्कादायक खुलासा अहवाल पुढे आला आहे. एनसीआरबीच्या अहवालात ही धक्कादायक आकडेवारी समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या २ वर्षापासून कोरोना काळात अनेक व्यवसाय बंद करण्यात आले होते. त्यामुळे , व्यापारी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला होता. त्यामुळे कोरोना काळात निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे व्यापाऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे म्हटले जात आहे.

२०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये उद्योजकांच्या आत्महत्यांमध्ये २९ टक्क्यांनी वाढ

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, वर्ष २०२० मध्ये ११ हजार ७१६ व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. तर, याच कालावधीत एकूण १० हजार ६७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. त्यामुळे, २०१९ च्या तुलनेत २०२० या वर्ष मध्ये उद्योजकांच्या आत्महत्यांमध्ये २९ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे. तर व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये जवळजवळ ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना काळात व्यापाऱ्यांभोवतीही आर्थिक संकटाचा फास आवळला गेल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे. दरम्यान,  आत्महत्या केलेल्या ११ हजार ७१६ व्यावसायिकांमध्ये ४३५६ व्यापारी आहेत. तर, ४२२६ प्रकरणे ही वेंडर्सची आहेत. तर, उर्वरित प्रकरणे अन्य व्यावसायिकांशी निगडित असल्याचं समोर आल आहे.

२०२९ या वर्षी २९०६ एवढ्या व्यापाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत

दरम्यान, देशभरात १ लाख ५३ हजार ५२ जणांच्या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात २०१९ या वर्षाच्या तुलनेत २०२० या वर्षी ४९.९ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कारण , २०२९ या वर्षी २९०६ एवढ्या व्यापाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत तर २०२० या वर्षी ४३५६ एवढ्या व्यापाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे, देशभरात एकूण आत्महत्यांच्या प्रकरणांमध्ये आत्महत्येच्या प्रकरणात १० टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

 

आतापर्यंत कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव नसणे यांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू होत्या

कोरोना काळात अनेक लहान व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव नसणे यांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू होत्या. मात्र, कोरोना काळात लहान व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. व्यावसायिकही मोठ्या दबावात असल्याचे 'फेडरेशन ऑफ इंडियन माइक्रो स्मॉल और मीडियम एंटरप्राइज'चे सचिव अनिल भारद्वाज यांनी म्हटल आहे. एनसीआरबीने या तीन श्रेणीतच व्यावसायिक समुदायांशी निगडित असल्याचे अधोरेखित केले गेले आहे. वर्ष २०१९ च्या तुलनेत व्यावासायिक समुदायामध्ये २०२० मध्ये आत्महत्यांच्या प्रकरणात २९ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी