मनोधैर्य योजनेकडे शासनाचं दुर्लक्ष, मदत निधी मिळवणाऱ्या पीडित महिलांची संख्या कमी; चित्रा वाघ यांचा आरोप

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 10, 2022 | 07:33 IST

बलात्कार पीडित (Rape victim) महिला (woman) तसेच लैंगिक छळाच्या (sexual harassment) प्रकरणातील अल्पवयीन मुलींना (Minor girls)त्यांच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा जीवनात उभारी घेता यावी, या उद्दिष्टाने महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) अनेक वर्षांपासून मनोधैर्य योजना (Manodhairya Yojana) राबवीत आहे.

Government's neglect of Manodhairya Yojana, Chitra Vagh's allegation
मनोधैर्य योजनेकडे शासनाचं दुर्लक्ष, चित्रा वाघ यांचा आरोप  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गेल्या काही वर्षात मनोधैर्य योजनेकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे का अशी शंका
  • वर्ष 2014-15 मध्ये मनोधैर्य योजनेत निधी मिळवणाऱ्या महिलांची संख्या 2 हजार 502 होती.

मुंबई : बलात्कार पीडित (Rape victim) महिला (woman) तसेच लैंगिक छळाच्या (sexual harassment) प्रकरणातील अल्पवयीन मुलींना (Minor girls)त्यांच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा जीवनात उभारी घेता यावी, या उद्दिष्टाने महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) अनेक वर्षांपासून मनोधैर्य योजना (Manodhairya Yojana) राबवीत आहे. मात्र गेल्या काही वर्षात मनोधैर्य योजनेकडे सरकारचे (government) दुर्लक्ष होत आहे का अशी शंका निर्माण झाल्याचे सांगत भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी यासंदर्भात आघाडी सरकारवर आरोप केले आहे. कमालीची गोष्ट म्हणजे 2014 ते 19 दरम्यान फडणवीस सरकार सत्तेत असतानाही मनोधैर्य योजनेचा निधी आणि लाभ मिळवणाऱ्या पीडित महिलांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचे आकड्यांवरून दिसून येते.

Read Also :  पहिल्या बुलेट ट्रेनचं किती असेल भाडे? रेल्वेमंत्री म्हणतात..

पीडित महिलांची आणि मुलींची संख्या सातत्याने कमी 

एका बाजूला बलात्कार तसेच लैंगिक छळाच्या घटना वाढत असताना वर्षागणिक मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून मदत निधी मिळवणाऱ्या पीडित महिलांची आणि मुलींची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या काही वर्षात मनोधैर्य योजनेमध्ये मदत मिळवून नव्याने जीवन सुरू करणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेतली तर सातत्याने निधी मिळवणाऱ्या पीडितांची संख्या खाली घसरत असल्याचं दिसत आहे. वर्ष 2014-15 मध्ये मनोधैर्य योजनेत निधी मिळवणाऱ्या महिलांची संख्या 2 हजार 502 होती. ती वर्ष 2019-20 पर्यंत 462 पर्यंत खाली आली आहे. 

पोलिसांकडून मनोधैर्य योजनेसाठी निधी देण्यासंदर्भातले प्रस्ताव गेल्यानंतरही शासन पातळीवर निधी मिळत नव्हते असे आरोप चित्रा वाघ यांनी केले आहेत. दरम्यान चित्रा वाघ असा आरोप करत असल्या तरी फडणवीस सरकार सत्तेत असतानाही मनोधैर्य योजनेत निधी घेणाऱ्यांची संख्या मोठी होती असे नाही. 

Read Also : उत्तर महाराष्ट्राला एक नाही दोन नाही थेट पाच मंत्रिपदे

 मनोधैर्य योजनेत लाभ मिळवणाऱ्या पीडित महिला 

   वर्ष लाभ मिळणाऱ्या पीडित महिला
2014-15            2502
2015-16           2588
2016-17           1707
2017-18           1302
2018-19           1140
2019-20           462
2020-21           650

दरम्यान, चित्रा वाघ महिलांच्या प्रश्नांवरुन, समस्यांवरुन संबंधित मंत्र्यांना सरकारला जोरदार धारेवर धरत त्यांच्याकडून जाब न घाबरता  विचारत असतात. भाजप- शिंदे गटाचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर यात संजय राठोड यांना मंत्रीपद देण्यात आलं. तेव्हा चित्रा वाघ यांनी आपला निषेध नोंदवला. आपण आपला लढा असाच चालू देऊ असं त्या म्हणाल्या. 
            

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी