Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी होणार सुकर, ५० नव्या लोकल सेवा होणार दाखल

Mumbai Loca new service मुंबईकरांचा लोकल प्रवास लवकरच सुकर होणार आहे. मुंबईकरांच्या सेवेसाठी ५० नव्या लोकल सेवा दाखल होणार आहेत. शनिवारी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घेतला होता, हा मेगाब्लॉक संपला आहे. तसेच ठाणे ते दिवादरम्यान मुख्य मार्गावरी धीम्या गाड्यांसाठी ९ किमीचा नवा कॉरिडर तयार झाला आहे.  

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • मुंबईकरांचा लोकल प्रवास लवकरच सुकर होणार आहे.
  • मुंबईकरांच्या सेवेसाठी ५० नव्या लोकल सेवा दाखल होणार आहेत.
  • ठाणे ते दिवादरम्यान मुख्य मार्गावरी धीम्या गाड्यांसाठी ९ किमीचा नवा कॉरिडर तयार झाला आहे.  

Mumbai Local : मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास लवकरच सुकर होणार आहे. मुंबईकरांच्या सेवेसाठी ५० नव्या लोकल सेवा दाखल होणार आहेत. शनिवारी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घेतला होता, हा मेगाब्लॉक संपला आहे. तसेच ठाणे ते दिवादरम्यान मुख्य मार्गावरी धीम्या गाड्यांसाठी ९ किमीचा नवा कॉरिडर तयार झाला आहे.  धीम्या लोकल या नव्या मार्गिकेवर धावत आहेत. मध्य रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेसाठी १४, ८, आणि ७२ तासांचा मेगाब्लॉक बाकी आहे. यापैकी ७२ तासांचा मेगाब्लॉक फेब्रुवारीमध्ये होणार आहे. त्यानंतर या मार्गिकेवर लोकलच्या नव्या ५० सेवा सुरू होणार आहेत. 

मुंबई रेल्वे विकास कॉर्पेशनकडून ठाणे ते दिवा दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. परंतु ब्लॉक घेणे हे मध्य रेल्वेचे काम आहे. पुढील महिन्यात होणार्‍या ७२ तासांच्या मेगाब्लॉकमध्ये दुसर्‍या राज्यातील ट्रेनही रद्द होण्याची शक्यता रेल्वेच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. अशा वेळी रेल्वेकडून परवानगी घेणे गरजेचे आहे. मुंबई  रेल्वे विकास कॉर्पोरेशननुसार ६ फेब्रुवारी रोजी हा ७२ तासांचा मेगाब्लॉक होण्याची शक्यता आहे. 


म्हणून ही मार्गिका महत्त्वाची 

  1. ठाणे ते दिवा ९ किमी  दरम्यान ४ मार्गिका आहेत.
  2. ठाणे ते कुर्ला आणि दिवा ते कल्याण दरम्यान ६ मार्गिका
  3. दिवा ते ठाणे दरम्यान २ मार्गिका कमी असल्याने अडचण
     

ठाण्याहून दिव्याल्या जाणारी गाडी कळवा बोगाद्यातून निघून रेल्वेच्या नव्या ओव्हर ब्रिजवरून धावतील. या गाड्या मुंब्रा स्थानकावरील नव्या फलाटावर थांबतील. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कळवा दिवा दरम्यान साडे सहा किमीचा नवा मार्ग सुरू करण्यात आला आहे. पूर्वी १८ तासाचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता, त्यामुळे दीड किमी नव्या मार्गाचे काम पूर्ण झाले होते. आता कळवा ते दिवादरम्यान नवा साडेसहा कि.मीचा मार्ग उपलब्ध झाला आहे.  

ठाणे ते दिवादरम्यान अजूनही ९ किमीच्या चार मार्गिकेचे काम सुरू आहे. तर दिवा ते कल्याण आणि ठाणे ते कुर्लादरम्यान सहा मार्गिकांचे काम बाकी आहेत. त्यामुळे दिवा ते ठाणे दरम्यान जून २ मार्गिकेचे काम बाकी असल्याने प्रवाशांना अजून मेगाब्लॉकचा त्रास सहन करावा लागणार आहे. ९ किमीवरील ही अतिरिक्त मार्गिका बंद असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या लोकलच्या मार्गिकेवर चालवाव्या लागत आहेत, त्यामुळेच गाड्या उशीरा धावत असतात. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टचा हा प्रकल्प संपायला अजून जास्त अवधी लागणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी