New Guidelines for Maharashtra : कोरोना संकट वाढले, महाराष्ट्रात ३१ डिसेंबर २०२१ पासून लागू होणार नव्या मार्गदर्शक सूचना

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 31, 2021 | 00:11 IST

New Guidelines for Maharashtra from 31st December 2021 : महाराष्ट्रातले ओमायक्रॉन आणि कोरोना असे दुहेरी संकट वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे राज्यात ३१ डिसेंबर २०२१ पासून नव्या मार्गदर्शक सूचना लागू होत आहेत. या सूचनांबाबतचा आदेश राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने काढला आहे...

New Guidelines for Maharashtra from 31st December 2021
कोरोना संकट वाढले, महाराष्ट्रात ३१ डिसेंबर २०२१ पासून लागू होणार नव्या मार्गदर्शक सूचना 
थोडं पण कामाचं
  • कोरोना संकट वाढले, महाराष्ट्रात ३१ डिसेंबर २०२१ पासून लागू होणार नव्या मार्गदर्शक सूचना
  • महाराष्ट्रात ३२५ ओमायक्रॉन आणि १८२१७ कोरोना Active रुग्ण
  • महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.६८ टक्के, रिकव्हरी रेट ९७.५५ टक्के

New Guidelines for Maharashtra from 31st December 2021 : मुंबई : महाराष्ट्रातले ओमायक्रॉन आणि कोरोना असे दुहेरी संकट वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे राज्यात ३१ डिसेंबर २०२१ पासून नव्या मार्गदर्शक सूचना लागू होत आहेत. या सूचनांबाबतचा आदेश राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने काढला आहे...

महाराष्ट्रात ३२५ ओमायक्रॉन आणि १८२१७ कोरोना Active रुग्ण

महाराष्ट्रात ३२५ ओमायक्रॉन आणि १८ हजार २१७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ४५० ओमायक्रॉनबाधितांपैकी १२५ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ८८ लाख ८७ हजार ३०३ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ७० हजार ७५४ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख ७० हजार ७५४ कोरोना रुग्णांपैकी ६५ लाख ७ हजार ३३० जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ५१८ मृत्यू झाले. तसेच ३६८९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात ५३६८ नव्या कोरोना रुग्णांची आणि २२ मृत्यूची नोंद झाली. तसेच ११९३ कोरोना रुग्ण बरे झाले. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.६८ टक्के, रिकव्हरी रेट ९७.५५ टक्के आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात १ लाख ३३ हजार ७४८ जण होम क्वारंटाइन तर १०७८ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

महाराष्ट्रात ३१ डिसेंबर २०२१ पासून लागू होणार नव्या मार्गदर्शक सूचना

  1. लग्न सोहळ्यासाठी (खुल्या जागेत वा बंदीस्त जागेत) जास्तीत जास्त ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी
  2. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक अशा कोणत्याही कार्यक्रमासाठी (खुल्या जागेत वा बंदीस्त जागेत) जास्तीत जास्त ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी
  3. अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी
  4. मैदान, समुद्रकिनारे तसेच पर्यटनाच्या जागांच्या ठिकाणी कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू. पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास बंदी. 
  5. कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि मास्क घालण्याचे तसेच सोशल डिस्टंस राखण्याचे बंधन. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी