मुंबई : मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने (MRVC) गुरुवारी 2.6 किलोमीटर लांबीच्या बोगद्यासाठी डोंगर फोडला. हा सर्वात लांब बोगदा असेल. या मार्गामुळे सीएसएमटी ते कर्जत प्रवासाचा वेळ 20 मिनिटांपेक्षा कमी होईल. (New rail corridor to save 20 minutes’ trave time between CSMT and Karjat)
या दुहेरी कॅरेजवेमध्ये एकूण तीन बोगदे आणि दोन रेल्वे ओव्हरब्रिज असतील जे मुंबई महानगर प्रदेशाच्या दोन सर्वात दूरच्या टोकांना - रायगड आणि नवी मुंबई यांना जोडतील. एकूण 3.12 किमी लांबीच्या बोगद्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. 14 फेब्रुवारी रोजी या करारावर स्वाक्षरी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बोगद्यासाठी खोदकामही सुरू झाले आहे.
अधिक वाचा : Maharashtra Budget Session: 'किमान पुढच्या अधिवेशनापूर्वी तरी....' विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारवर संतापले
एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुभाष चंद गुप्ता म्हणाले की, या दुहेरी मार्गामुळे कर्जतमार्गे मुंबई ते पनवेल असा पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. कल्याण मार्गे सध्याच्या मार्गाच्या तुलनेत कमी अंतरामुळे सीएसएमटी ते कर्जत दरम्यानचा प्रवास वेळही कमी होईल. हा अतिरिक्त उपनगरीय कॉरिडॉर वेगाने वाढणाऱ्या पनवेल, कर्जत आणि नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) च्या आर्थिक विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल.
अधिक वाचा : Holi special Trains: होळीनिमित्त स्पेशल ट्रेन, मुंबईहून सोडण्यात येणार अतिरिक्त 26 विशेष गाड्या, पाहा संपूर्ण यादी
पनवेल आणि कर्जत स्थानकांवरील पायाभूत सुविधांच्या उभारणीवरून MRVC आणि मध्य रेल्वेमध्ये यापूर्वी वाद झाले आहेत. अधिकारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रोड ओव्हर/ अंडर ब्रिज आणि कर्जत आणि पनवेल येथे प्रत्येकी एक रेल्वे उड्डाणपूल बांधतील. हा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.