छोटा शकीलच्या दोन सहकाऱ्यांना अटक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 13, 2022 | 18:23 IST

NIA arrests two associates of gangster Chhota Shakeel for handling Dawood gang’s illegal activities : एनआयएने (National Investigating Agency - NIA) दाऊदचा विश्वासू छोटा शकील याच्या दोन सहकाऱ्यांना मुंबईतून अटक केली. अटक केलेले दोघेजण मुंबईत दाऊदसाठी बेकायदा कामं करत होते.

NIA arrests two associates of gangster Chhota Shakeel for handling Dawood gang’s illegal activities
छोटा शकीलच्या दोन सहकाऱ्यांना अटक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • छोटा शकीलच्या दोन सहकाऱ्यांना अटक
  • अटक केलेले दोघेजण मुंबईत दाऊदसाठी बेकायदा कामं करत होते
  • आरिफ अबुबकर शेख आणि शब्बीर अबुबकर शेख अशी अटक केलेल्या दोघांची नावं

NIA arrests two associates of gangster Chhota Shakeel for handling Dawood gang’s illegal activities : मुंबई : एनआयएने (National Investigating Agency - NIA) दाऊदचा विश्वासू छोटा शकील याच्या दोन सहकाऱ्यांना मुंबईतून अटक केली. अटक केलेले दोघेजण मुंबईत दाऊदसाठी बेकायदा कामं करत होते. आरिफ अबुबकर शेख आणि शब्बीर अबुबकर शेख अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत.  या आरोपींना २० मे २०२२ पर्यंत एनआयए कोठडी देण्यात आली आहे.

एनआयएने मुंबईत (एनआयएचा मुंबई कमिशनरेट विभाग) २४ आणि मिरा भाईंदरमध्ये (एनआयएचा मिरा भाईंदर कमिशनरेट विभाग) पाच ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यानंतर ही कारवाई करण्यात आली. याआधी ३ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबई आणि भोवतालच्या परिसरातील २९ ठिकाणी एनआयएने धाडी टाकल्या होत्या. 

दाऊद इब्राहीम आणि छोटा शकील यांच्य विरोधात भारताने इंटरपोलच्या माध्यमातून रेड कॉर्नर नोटीस काढली आहे. दोन्ही आरोपी पाकिस्तानच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी दडून बसले आहेत. भारतीय तपास यंत्रणा या दोन्ही आरोपींसह दाऊदच्या टोळीशी संबंधित सदस्यांविरोधात अधूनमधून पुराव्यांच्या आधारे कारवाई करत असते. पण मागील काही दिवसांत एनआयएने मोठ्या संख्येने धाडी टाकल्यामुळे ताज्या कारवाईने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी