सचिन वाझेंना घेऊन NIA टीम मिठी नदी जवळ, नदीतून डीव्हीआर, गाडीच्या नंबर प्लेट्ससह इतर साहित्य जप्त

NIA takes Sachin Waze to the bridge over Mithi river in Mumbai: मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात एनआयएच्या टीमने सचिन वाझेंना घेऊन मिठी नदी परिसरात तपास गेला असता अनेक गोष्टी आढळून आल्या आहेत. 

NIA takes Sachin Waze to the bridge over Mithi river CPU number plate of a vehicle and other items recovered
मिठी नदीतून डीव्हीआर, गाडीच्या नंबर प्लेट्ससह इतर साहित्य जप्त  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • सचिन वाझेंना घेऊन एनआयएच्या टीमचा मिठी नदीच्या जवळ तपास सुरू
  • मिठी नदीतून एनआयएच्या टीमने जप्त केले सीपीयू, गाडीच्या नंबर प्लेट्स आणि इतर साहित्य
  • मनसुख हिरन मृत्यू प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग

मुंबई : मनसुख हिरन (Mansukh Hiren) मृत्यू प्रकरणात एनआयएने आपला तपास सुरू केला असून एनआयएची टीम रविवारी सचिन वाझे यांना घेऊन मिठी नदी पुलावर पोहोचली. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मिठी नदीवरील पुलावर एनआयएची टीम दाखल झाली. यानंतर मिठी नदीमध्ये शोध घेण्यास सुरूवात केली असता नदीतून कम्प्युटर सीपीयू, एका गाडीच्या दोन नंबर प्लेट्स आणि इतरही सामान आढळून आलं आहे. (NIA takes Sachin Waze to the bridge over Mithi river CPU number plate of a vehicle and other items recovered)

सचिन वाझे यांनी पुरावे नष्ट केल्याचा संशय़ एनआयएला होता त्यानंतर सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर रविवारी मिठी नदीच्या किनाऱ्यावर घेऊन आले. यावेळी स्वीमर्सच्या मदतीने शोध घेतला असता नदीतून एक डीव्हीआर, एक सीपीयू आणि गाडीचे नंबर प्लेट्स आढळून आले आहेत. सीपीयू आणि नंबर प्लेट्स हे नेमके कुठले आहेत याची माहिती आता एनआयएची टीम घेत आहे.

सचिन वाझे यांना एनआयएच्या कोठडीत न्यायालयाने पाठवले होते त्यानंतर ही एनआयए कोठडी संपल्यावर वाझे यांना पुन्हा एनआयएने न्यायालयात हजर करुन आणखी १५ दिवसांची कस्टडी मागितली होती मात्र, न्यायलयाने ३ एप्रिलपर्यंत कोठडी दिली आहे. सचिन वाझे यांनी न्यायालयात सांगितले होते की, अँटिलिया जवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणाच्या तपास त्यांच्याकडे केवळ दीड दिवस होता. यानंतर अचानक त्यांना तपास अधिकारी पदावरुन हटवण्यात आलं. या प्रकरणात मला अडकवण्यात येत असल्याचंही वाझेंनी म्हटलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी