मध्य रेल्वेवर ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 10, 2022 | 09:59 IST

night traffic and power block on central railway : मध्य रेल्वे मार्गावर रविवार १२ जून २०२२ रोजी रात्री १२.४० ते पहाटे ४.४० या वेळेत ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

night traffic and power block on central railway
मध्य रेल्वेवर ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मध्य रेल्वेवर ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक
  • मध्य रेल्वे मार्गावर रविवार १२ जून २०२२ रोजी रात्री १२.४० ते पहाटे ४.४० या वेळेत ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक
  • माटुंगा ते विद्याविहार दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक

night traffic and power block on central railway : मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर रविवार १२ जून २०२२ रोजी रात्री १२.४० ते पहाटे ४.४० या वेळेत ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रोड क्रेन वापरून कुर्ला स्टेशन येथे आठ मीटर रुंद पाच प्लेट गर्डर टाकण्यासाठी डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येतील. माटुंगा ते विद्याविहार दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.१४ ते रात्री १२.२८ या कालावधीत सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील गाड्या आणि दादर येथून रात्री १२.२९ वाजता ठाण्यासाठी सुटणारी डाऊन मार्गावरील गाडी या गाड्या माटुंगा ते विद्याविहार दरम्यान डाऊन स्लो ऐवजी डाऊन फास्ट मार्गावरून धावतील. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १०.०४ वाजता सुटणारी कल्याण लोकल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११ वाजता सुटणारी ठाणे लोकल या दोन्ही गाड्या कुर्ला स्टेशनपर्यंतच धावतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.२० वाजता कुर्ला स्टेशनसाठी सुटणारी गाडी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला एसी लोकल रद्द करण्यात आली आहे. 

कल्याण येथून रात्री १०.२६ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठीची लोकल आणि कल्याण येथून रात्री १०.५६ वाजता सुटणारी  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठीची एसी लोकल कुर्ला स्टेशनपर्यंतच जाणार आहे. कल्याण येथून ठाण्यासाठी रात्री ११.४७ वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. ब्लॉक काळात विद्याविहार येथील डाऊन मार्गावरील सेवा बंद असेल.

ब्लॉक काळात शक्य असल्यास प्रवास टाळून सहकार्य करावे; असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. ते शक्य नसल्यास ब्लॉक सुरू होण्याआधी प्रवास करून ब्लॉकचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी; असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी