'निसर्ग' अलिबागमध्ये शिरला... सॅटेलाईटमधून चक्रीवादळावर नजर, पाहा वादळ कुठे धडकतंय! 

मुंबई
रोहित गोळे
Updated Jun 03, 2020 | 14:18 IST

निसर्ग चक्रीवादळाने अलिबाग समुद्र किनाऱ्याला धडक दिली आहे. हे वादळ नेमकं कुठवर पोहचलं आहे हे आपल्याला सॅटेलाईटच्या माध्यमातून पाहता येणार आहे. 

nisarga cyclone enters alibag look at the cyclone from the satellite see where the is hitting
'निसर्ग' अलिबागमध्ये शिरला... सॅटेलाईटमधून चक्रीवादळावर नजर, पाहा वादळ कुठे धडकतंय! (फोटो सौजन्य: windy.com) 

थोडं पण कामाचं

  • निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकलं
  • चक्रीवादळ वेगाने मुंबईच्या दिशेने पुढे सरसावलं
  • चक्रीवादाळावर सॅटेलाईटच्या माध्यमातून नजर

मुंबई: 'निसर्ग' चक्रीवादळाने आपला तडाखा देण्यास सुरुवात केली आहे. कारण या वादळाची पहिली भिंत ही कोकण किनारपट्टीला धडकली आहे. त्यामुळे सध्या किनारपट्टी भागात ताशी १०० हून अधिक वेगाने वारे वाहत आहेत. ज्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडत आहेत. तर काही घरांवरील पत्रेही उडून जात आहेत. सध्या या वादळाची पहिला भिंत ही रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर इथे धडकली आहे. पण याचा सर्वाधिक परिणाम हा रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, दिवे-आगार, अलिबाग, मुरुड येथील किनारपट्टी भागाला बसला आहे. कार चक्रीवादळाचा नेमका रोख हा याच दिशेने आहे. 

दरम्यान, हे चक्रीवादळ नेमकं कसा प्रवास करतंय हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. या वादळावर सॅटेलाईटच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. आता या वादळाचा मुख्य गाभा देखील अलिबाग येथे धडकलं आहे 

वादळाची नेमकी स्थिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

(फोटो सौजन्य: windy.com)

एनडीआरएफ सज्ज 

या संकटाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून एनडीआरएफच्या जवानांनी किनारपट्टी जवळ राहणाऱ्या अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. याशिवाय येथील अनेक ग्रामीण भागातील तरुणांना संकट काळात कशाप्रकारे मदत करायची याचं देखील प्रशिक्षण दिलं आहे. त्यामुळे या वादळाला तोंड देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालं आहे. 

महाराष्ट्रात १२९ वर्षानंतर घडणार असं काही!

दरम्यान, जसजसं वादळ पुढे सरकत आहे तसतसा वाऱ्याच वेग आणि पावसाचा जोर देखील वाढत आहे. हे वादळ अलिबागच्या जवळपास धडकणार असून पुढे मुंबईहून धुळ्यापर्यंत प्रवास करणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या १२९ वर्षात पहिल्यांदाच चक्रीवादळ हे मुंबई आणि महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हे वादळ नेमकं किती घातक ठरु शकते हे पुढील काही काळातच समजेल. मात्र, असं असलं तरीही प्रशासन देखील पूर्ण तयारीनिशी या संकटावर मात करण्यासाठी सज्ज झालं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी