राम मंदिराच्या देणगीवरुन निलेश राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले...

मुंबई
पूजा विचारे
Updated Mar 08, 2020 | 18:34 IST

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्येचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेवर माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे.

Nilesh Rane And cm
राम मंदिराच्या देणगीवरुन निलेश राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले... 

मुंबईः मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्येचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतलं. तसंच राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेतर्फे एक कोटी रुपये देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेवर माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे. मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी 45 कोटी खर्च केले, मात्र राम मंदिरासाठी फक्त 1 कोटी दिले. याचं तुम्हाला कसं काहीच वाटत नाही, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, लाज नाही वाटली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त एक करोड रुपये जाहीर करताना. मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी ४५ कोटी पण राम मंदिराला फक्त एक कोटी???

 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

पत्रकार परिषद घेऊन त्यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय. भाजप आणि हिंदुत्व या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.  आम्ही भाजपपासून बाजुला झालो आहोत, हिंदुत्वापासून नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मंदिर बांधकामात फुल नाही तर फुलाची पाकळी या विचाराने अतिशय विनम्रपणे हे योगदान देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. 

तसंच उत्तर प्रदेश सरकारला अयोध्येत महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन बनवण्याची विनंती करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 2018 मध्ये मी पहिल्यांदा इथे आलो होतो, त्यानंतर मी पुन्हा इथं येईल असं म्हटलं होतं. अयोध्येत येणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, हे सांगायला हे उद्धव ठाकरे विसरले नाहीत.  मी मुख्यमंत्री होईन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण ती गोष्ट घडली असं सांगत शरयू नदीची आरती करण्याची इच्छा होती पण कोरोनामुळे ते शक्य नसल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.   

 

 

मी पुन्हा अयोध्येत येईन आणि आरतीही करेन, असं देखील मुख्यमंत्री म्हणालेत. नोव्हेंबरमध्ये मी पहिल्यांदा अयोध्येत आलो होतो आणि एक वर्षानंतर नोव्हेंबरमध्येच मुख्यमंत्री झालो, असा योगायोगही यावेळी उद्धव ठाकरे सांगितला. मुख्यमंत्री म्हणून नाही, महाराष्ट्र सरकारच्या वतीने नाही तर ही देणगी ट्रस्टच्या वतीने देत असल्याचं त्यांनी सांगितलं. माझी ही तिसरी अयोध्या भेट असून प्रत्येक दौऱ्यानंतर आम्हाला यश मिळालं असंही त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी