भारतात शरिया कायदा नाही, हिंदूंना टार्गेट केल्यास जशास तसे उत्तर देऊ : नितेश राणे

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 06, 2022 | 15:31 IST

Nitesh Rane : भारतात शरिया कायदा नाही, हिंदूंना टार्गेट केल्यास जशास तसे उत्तर देऊ असे भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले.

Nitesh Rane Press Conference On Umesh Kolhe Murder Case Warns Anti Hindu Activities
भारतात शरिया कायदा नाही, हिंदूंना टार्गेट केल्यास जशास तसे उत्तर देऊ : नितेश राणे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारतात शरिया कायदा नाही : नितेश राणे
  • हिंदूंना टार्गेट केल्यास जशास तसे उत्तर देऊ : नितेश राणे
  • हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल : नितेश राणे

Nitesh Rane : भारतात शरिया कायदा नाही, हिंदूंना टार्गेट केल्यास जशास तसे उत्तर देऊ असे भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार राहिले नाही. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक राहिलेले नाहीत. हिंदूंना टार्गेट केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल; असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

भाजपच्या नुपुर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात उमेश कोल्हे यांची हत्या झाली. भाजप एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे आणि नुपुर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. पण फक्त नुपुर शर्मा यांना समर्थन दिले म्हणून कोणाची हत्या करण्याचे अधिकार कोणाही व्यक्ती अथवा गटाकडे नाही. ज्या प्रकारे उमेश कोल्हे यांची हत्या झाली त्याच प्रकारे क्रूरपणे आणखी एक हत्येचा प्रयत्न झाला. नगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये एका तरुणावर कोल्हे यांच्यावर झाला तसाच हल्ला झाला. सध्या तो तरुण गंभीर जखमी आहे आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आम्ही त्याला उपचारासाठी आमच्याकडून शक्य ती सर्व मदत करत आहोत, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली. 

आमच्या देवी देवतांची विटंबना केली, तरी आम्ही लोकशाही मार्गाने उत्तर देतो, मात्र एकालाही जीवे मारल्याचं ऐकलंय का? पण तुम्ही तशी पावलं उचलत असाल, तर आम्हालाही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी उत्तर द्यावं लागेल, हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल, आमच्या लोकांना हात लावण्याचा प्रयत्न करु नका, असा खुला संदेश द्यायचा असल्याचं नितेश राणे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी