nitesh rane's meow meow : ...म्हणून आदित्य ठाकरेंना बघून नितेश राणेंनी केलं 'म्याव म्याव'

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 23, 2021 | 21:32 IST

nitesh rane told reason for did 'meow meow' after saw aditya thackeray : सभागृहाबाहेर आमदार नितेश राणे यांनी मांजरीप्रमाणे म्याव म्याव आवाज काढला. सभागृहाबाहेर नितेश राणेंनी ही कृती आदित्य ठाकरे यांना बघून केली. नंतर नितेश राणेंनी त्यांच्या वर्तनामागील कारण माध्यमांना जाहीरपणे सांगितले.

nitesh rane told reason for did 'meow meow' after saw aditya thackeray
...म्हणून आदित्य ठाकरेंना बघून नितेश राणेंनी केलं 'म्याव म्याव' 
थोडं पण कामाचं
  • ...म्हणून आदित्य ठाकरेंना बघून नितेश राणेंनी केलं 'म्याव म्याव'
  • एकेकाळी शिवसेना वाघाप्रमाणे डरकाळ्या फोडण्यासाठी प्रसिद्ध होती - नितेश राणे
  • आता शिवसेनेची अवस्था म्याव म्याव करणाऱ्या मांजरीसारखी - नितेश राणे

nitesh rane told reason for did 'meow meow' after saw aditya thackeray : मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांची नक्कल केली. हे प्रकरण तापले आणि आमदार भास्कर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली. यानंतर आज (गुरुवार २३ डिसेंबर २०२१) सभागृहाबाहेर आमदार नितेश राणे यांनी मांजरीप्रमाणे म्याव म्याव आवाज काढला. सभागृहाबाहेर नितेश राणेंनी ही कृती आदित्य ठाकरे यांना बघून केली. नंतर नितेश राणेंनी त्यांच्या वर्तनामागील कारण माध्यमांना जाहीरपणे सांगितले.

एका व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, पोलिसांनी बजावली नितेश राणेंना नोटीस

एकेकाळी शिवसेना वाघाप्रमाणे डरकाळ्या फोडण्यासाठी प्रसिद्ध होती. पण आता शिवसेनेची अवस्था म्याव म्याव करणाऱ्या मांजरीसारखी झाली आहे. यामुळेच शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंना बघून म्याव म्याव आवाज काढला; असे नितेश राणे यांनी सांगितले. 

आमदार नितेश राणे अनेकदा शिवसेना आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांवर टीका करत असतात. अनेकदा त्यांनी टीका करण्यासाठी ट्विटर, फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. याआधी सुशांत सिंह राजपूतची एक्स सेक्रेटरी दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी नितेश राणेंनी थेट आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले होते. मुंबई पोलीस दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना चौकशीसाठी बोलावणार आहेत का?, कायदा सर्वांसाठी समान असतो; अशा स्वरुपाची वक्तव्य नितेश राणेंनी केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी