'कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही'

मुंबई
Updated Mar 18, 2020 | 13:30 IST

कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी रक्ताची चााचणी केली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. 

no blood test done for corona test said health minster rajesh tope 
'कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही'  |  फोटो सौजन्य: AP

मुंबई: भारतासह जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत लोकांमध्ये प्रचंड घबराट दिसून येत आहे. मात्र, आता या आजाराबाबत नवनवे खुलासे होऊ लागले आहेत. त्यातच आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक नवा खुलासा केला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, संशयित रुग्णांची कोरोनसाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. 

पाहा नेमकं काय म्हणाले आरोग्यमंत्री: 


'राज्यात संशयित रुग्णांची कोरोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा घशाचा द्राव ( 'नसो फैरिंजीयल स्वाब' ) घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. राज्यात मुंबई, पुणे व नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात.' असं राजेश टोपे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.  

यासोबतच त्यांनी असंही स्पष्ट केलं आहे की, 'राज्यात काही दिवसात 4 ते 5 ठिकाणी प्रयोगशाळा वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत असून कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही. नागरिकांनी चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये.' 

दरम्यान, राज्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण वाढला असून आता रुग्णांची एकूण संख्या ४२ झाली आहे. पुण्यात एक नवा रुग्ण आढळून आला आहे. दुसरीकडे संपूर्ण देशभरात आतापर्यंत १४७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजतं आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...