Rajesh Tope on Lockdown : मुंबई लोकल तुर्तास बंद होणार नाही, लॉकडाऊनचा विचार नाही,  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Rajesh Tope on Lockdown राज्यात लॉकडाऊन लागणार नाही आणि मुंबई लोकलही बंद होणार नाही असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच जरी राज्यात आणि मुंबईत कोरोना वाढत असला तरी मृत्यूदर आणि रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे, लसीकरणामुळेच हे शक्य झाल्याचे टोपे म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • राज्यात लॉकडाऊन लागणार नाही
  • मुंबई लोकलही बंद होणार नाही
  • लसीकरणामुळे परिस्थिती आटोक्यात

Rajesh Tope on Lockdown : मुंबई :  गेल्या काही दिवसांत राज्यात आणि देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का यावर चर्चा सुरू होती. तसेच गर्दी टाळण्यासाठी पुन्हा लोकल बंद होणार का याबाबतही चर्चा सुरू होती. अखेर राज्यात लॉकडाऊन लागणार नाही आणि मुंबई लोकलही बंद होणार नाही असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. (no lockdown and no local shut in mumbai health minister rajesh tope clarify over corona patients increase) 

तसेच जरी राज्यात आणि मुंबईत कोरोना वाढत असला तरी मृत्यूदर आणि रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे, लसीकरणामुळेच हे शक्य झाल्याचे टोपे म्हणाले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राज्यातील कोरोनावर टोपे आणि पवार यांच्यात चर्चा झाली. बैठकीनंतर टोपे यांनी पत्रकारांशी सवांद साधला. तेव्हा टोपे म्हणाले की, शरद पवार यांनी आरोग्य विभागाकडून संपूर्ण परिस्थिती समजून घेतली, त्यावर काय उपाययोजना करता येईल याची त्यांनी माहिती घेतली.  त्यांनी आमच्याकडून एक काय करावे आणि काय नाही करावे याची एक सूचना मागवली आहे. त्यानंतरचे ते लोकांशी बोलतील असे टोपे म्हणाले. 


लॉकडाऊनचा विचार नाही

राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबई लोकल बंद करण्याचाही कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे त्यांनी म्हटले. आहे ते निर्बंध अधिक कसे कडक करता येतील जेणेकरून लोक गर्दी करणार नाही आण कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही यावर शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच लॉकडाऊनबद्दल कुठलाही विचार झालेला नाही, निर्बंधाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वाढ होऊ शकेल. निर्बंध लादताना यासंबंधित लोकांशी आणि टास्कफोर्सशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही टोपे म्हणाले. 

लसीकरणामुळे परिस्थिती आटोक्यात

काल राज्यात २५ हजार रुग्ण आढळले, मुंबईत १५ हजार रुग्ण आढळले आहेत, मुंबईत कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर हा २५ टक्के इतका आहे. रुग्णालयातील १० ते २० टक्के बेड्सवर कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून ८० टक्के बेड्स रिकामे आहेत. दुसर्‍या लाटेत जेवढी रुग्णसंख्या होती त्याचप्रमाणे परिस्थिती निर्माण झाल्यास तेवढे बेड्स मुंबईत उपलब्ध आहेत अशी माहिती टोपे यांनी दिली. तसेच ऑक्सिजनची मागणी अजून वाढलेली नाही. मृत्यूदर वाढलेला नाही. या सर्व बाबी जमेच्या असून परिस्थिती नियंत्रणात आहे. या सगळ्यांचे श्रेय मुंबईत झालेल्या लसीकरणाला आहे.  मुंबईतल्या पात्र नागरिकांना लस दिल्याने नागरिकांच्या शरीतात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. नागरिकांना जरी कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेली नाही. रुग्णांना आयसीयू बेड आणि ऑक्सिजनची गरज भासत नाहिये.  हा आजार सध्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नाही. नागरिकांना नाक आणि घशांपर्यंत हा विषाणू पोहोचत आहे. घशाला खवखव होणे, सर्दी खोकला होणे ही प्रमुख लक्षणे दिसत आहे. अजूनही ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही त्यांनी लस घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शरद पवार यांनी कोरोनासाठी आलेल्या निधीबाबतही चर्चा केली. आयसीयू बेड्स, जम्बो बेड्स, यासाठी प्रामुख्याने खर्च करण्याची गरज आहे. इतर गोष्टींसाठी जे पैसे लागतील त्याचे कंट्रात काढण्यात येतील आणि त्यासाठी निधीही मंजूर करण्यात येईल. 


राजकीय सभा आणि कार्यक्रम नाही

राजकीय सभा आणि कार्यक्रम होऊ नये ही अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केली आहे अशी माहिती टोपे यांनी दिली. कुठलीही राजकीय सभा, मिरवणूक आणि कार्यक्रम न करण्याचे शरद पवार यांच्या सूचना राष्ट्रवादीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  तसेच जे काही कार्यक्रम घ्यायचे असतील त्यात कमी उपस्थिती आणि सर्व नियमांचे पालन करूनच कार्यक्रमाचे आयोजन करावे असेही टोपे म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी