Lockdown in Maharashtra : राज्यात लॉकडाऊन न लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका, महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती

Lockdown in Maharashtra बीकेसीच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये अडीच हजार बेड्स उपलब्ध असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. तसेच मुंबईत जरी कोरोनाचे केसेस वाढत असले तरी वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला नाही असे स्पष्टीकरणही पेडणेकर यांनी दिले आहे.

थोडं पण कामाचं
  • कोविड सेंटरमध्ये अडीच हजार बेड्स उपलब्ध
  • मुंबईत वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला नाही
  • लॉकडाऊन लावण्यात येऊ नये अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका

Lockdown in Maharashtra : मुंबई : बीकेसीच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये(BKC Jumbo Covid Center)  अडीच हजार बेड्स उपलब्ध असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी दिली. तसेच मुंबईत जरी कोरोनाचे केसेस वाढत असले तरी वीकेंड लॉकडाऊन (weekend lockdown) लावण्यात आला नाही असे स्पष्टीकरणही पेडणेकर यांनी दिले आहे. कोरोनाचे संकट (corona crisis) वाढत असताना लॉकडाऊन लावण्यात येऊ नये अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांची भूमिका असल्याचेही पेडणेकर यांनी सांगितले.  (no lockdown in maharashtra says cm uddhav thackeray via mayor kishori pednekar )

राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट वाढत आहे. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण माहिती घेत आहेत. परंतु राज्यात लॉकडाऊन लावू नये अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनचे संकट वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआरने ही बाब गांभीर्याने घेण्यास सांगितली आहे.  वारंवार सूचना करूनही नागरिक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत, काही बेजबाबदार नागरिक मास्क वापरत नाहीत अशा लोकांनी कोरोना संबंधित नियम पाळावे असे आवाहन महापौर पेडणेकर यांनी केले आहे. आपल्याला पुन्हा लॉकडाऊन लावायचा नाही, सगळ्यांनी नियम पाळावे अन्यथा येणारा काळ अधिक धोकादायक असेल असेही पेडणेकर म्हणाल्या.  

सध्या मुंबईतील केबीसी जम्बो कोविड सेंटरमध्ये अडीच हजार बेड्स उपलब्ध आहेत. कुठलाही रुग्ण आयसीयूमध्ये दाखल नाही, तसेच बहुतांश रुग्णांना कोरोनाची कुठलीच लक्षणे नसल्याचेही पेडणेकर यांनी सांगितले. तर एक डिसेंबरपासून बीकेसीच्या जम्बो कोविडे सेंटरमध्ये ९३६ रुग्ण दाखल झाल्याची माहिती डॉ. राजेश डेरे यांनी दिली आहे. तसेच बहुतांश रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टची गरज नाही आणि एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही असेही डेरे यांनी यावेळी नमूद केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी