ऐकलं का! आता प्रवासाठी नाही लागणार ई-पास; लॉकडाऊनच्या नवीन नियम जाहीर

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 05, 2021 | 18:31 IST

राज्यातील जनता साखर झोपेत असताना राज्य सरकारने एक गोड निर्णय जाहीर केला तो म्हणजे, अनलॉक करण्याचा. राज्यातील लॉकडाऊन पाच टप्प्यांनी उघडण्यात येणार आहे.

 No longer required to travel e-pass
ऐकलं का! आता प्रवासाठी नाही लागणार ई-पास  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • स्थानिक प्रशासन आपल्या जिल्ह्याचा कुठल्या गटात समावेश होतो, हे जाहीर करुन त्यानुसार तिथे निर्बंध लागू होतील.
  • अनलॉकच्या गटनिहाय जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार फक्त पाचव्या गटातील भागात ई- पास बंधनकारक असेल.
  • शनिवारी (5 जून) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी केली

मुंबई : राज्यातील जनता साखर झोपेत असताना राज्य सरकारने एक गोड निर्णय जाहीर केला तो म्हणजे, अनलॉक करण्याचा. राज्यातील लॉकडाऊन पाच टप्प्यांनी उघडण्यात येणार आहे. याच बरोबर आता प्रवासासाठी ई-पासची ही गरज लागणार नसल्याचं सांगण्यात आले आहे. यामुळे ज्यांना आपल्या गावाकडे जायचं असेल तर तुम्हाला पास मिळवण्याची गरज राहणार नाही. अनलॉकच्या गटनिहाय जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार फक्त पाचव्या गटातील भागात ई- पास बंधनकारक असेल.
 शिवाय, प्रवास करताना पाचव्या गटातील कुठल्याही भागात तुमचा थांबा म्हणजेच स्टॉप असेल तर मात्र तुम्हाला ई-पास बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण दिलाशाची बाब अशी की, सध्या राज्यातील कुठलेही शहर किंवा जिल्ह्याचा पाचव्या गटात समावेश नाही. त्यामुळे आतातरी कोणालाही आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची गरज भासणार नाही. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनाने पुन्हा एकदा काही कठोर पावले उचण्यास सुरुवात केली होती. ज्याअंतर्गत राज्यात 'ब्रेक दि चेन'अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले होते. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले. याच धर्तीवर राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली होती.  अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना या ई पासची काढणे बंधनकारक होते. नागरिकांना काही महत्त्वच्या आणि खासगी कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई- पास काढणे अनिवार्य होते. अर्थात यावर स्थानिक प्रशासनाचा निर्णयही महत्वाचा असेल. पुढच्या सोमवार ते रविवारपर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी ही एक दिलाशाची बातमी आहे. त्यानंतर पुढच्या शुक्रवारी प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर स्थानिक प्रशासन आपल्या जिल्ह्याचा कुठल्या गटात समावेश होतो, हे जाहीर करुन त्यानुसार तिथे निर्बंध लागू होतील.

राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झालं असताना मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी (5 जून) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी केली आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जातील.अनलॉक करत असताना पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. पहिल्या स्तरात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरात 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसऱ्या स्तरात 15 जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या स्तरांमध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एकही जिल्हा नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या स्तरात त्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल. 20 टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट असेल आणि 75 टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तो पाचवा स्तर असेल. 
 


काय सुरू आणि काय बंद?

 

पहिला गट - मास्कसक्ती लागू आणि सोशल डिस्टंस राखा. १०० टक्के अनलॉक. रेल्वे, बससह सर्व प्रकारची वाहतूक सामान्यांसाठी सुरू. सर्व दुकानं आणि व्यवसाय सुरू. 
दुसरा गट - मास्कसक्ती लागू आणि सोशल डिस्टंस राखा. दुकानं, मॉल सुरू. हॉटेल आणि रेस्टॉरंट तसेच नाट्यगृह आणि सिनेमागृह येथे ५० टक्के लोकांना परवानगी. खेळाची मैदाने सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ सुरू राहतील. शूटिंग सुरू. लग्नासाठी आसन क्षमतेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १०० जणांच्या उपस्थितीला परवानगी. अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्यांसाठी संख्येचे बंधन नाही. निवडणूक, बैठकांवर निर्बंध नाही. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना ५० टक्के क्षमतेने परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा १०० टक्के क्षमतेने सुरू होईल. आसन क्षमतेइतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. या भागात जमावबंदी लागू असेल.

तिसरा गट - मास्कसक्ती लागू आणि सोशल डिस्टंस राखा. अत्यावश्यक दुकानं संध्याकाळी ४ पर्यंत आणि इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ पर्यंत सुरू राहणार.
चौथा गट - मास्कसक्ती लागू आणि सोशल डिस्टंस राखा. अत्यावश्यक दुकानं संध्याकाळी ४ पर्यंत सुरू. इतर दुकानं बंद. 
पाचवा गट - मास्कसक्ती लागू आणि सोशल डिस्टंस राखा. अत्यावश्यक दुकानं संध्याकाळी ४ पर्यंत सुरू. इतर दुकानं बंद.
तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या गटासाठी कोरोना प्रोटोकॉलचे इतर निर्बंध कायम राहतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी