पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉकचे वेळापत्रक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 17, 2021 | 03:35 IST

पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉकचे वेळापत्रक

No megablock on Western Railway this Sunday
पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉकचे वेळापत्रक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 'या' दिवशी पश्चिम रेल्वेवर आहे मेगाब्लॉक
  • मध्य रेल्वे मार्ग - मेगाब्लॉक
  • हार्बर रेल्वे मार्ग - मेगाब्लॉक

मुंबईः रुळ, सिग्नल, ओव्हरहेड वायर यांच्यासह वेगवेगळ्या यंत्रणांची देखभाल करण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर आज (शनिवार १६ ऑक्टोबर २०२१) मर्यादीत वेळेचा ब्लॉक आहे. पण उद्या (रविवार १७ ऑक्टोबर २०२१) पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नाही.

पश्चिम रेल्वे मार्गावर रुळ, सिग्नल, ओव्हरहेड वायर यांची देखभाल करण्यासाठी चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर आज (शनिवार १६ ऑक्टोबर २०२१) रात्री ११.५० ते उद्या (रविवार १७ ऑक्टोबर २०२१) पहाटे २.५० पर्यंत तीन तास जम्बोब्लॉक आहे. डहाणूकडे जाणाऱ्या जलद मार्गावर रविवार १७ ऑक्टोबर २०२१ रोजी मध्यरात्री १.३० ते ४.३० दरम्यान वसई रोड ते वैतरणा स्टेशन दरम्यान तीन तास जम्बोब्लॉक आहे. रविवार १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसा मेगाब्लॉक नसेल. 

ब्लॉकच्या कालावधीत पश्चिम रेल्वे मार्गावर मेल, एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्या त्यांच्या नियोजीत वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावतील. विरार-भरुच मेनलाइन इएमयू विरार येथून ब्लॉकच्या कालावधीत पहाटे ४.३५ ऐवजी पहाटे ४.५० वाजता सुटेल. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वेच्या चौकशीसाठीच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून अथवा स्टेशनमास्तरकडून माहिती घेऊन प्रवासी ब्लॉकच्या कालावधीतील त्यांच्या रेल्वे प्रवासाचे नियोजन करू शकतील.

मध्य रेल्वे मार्ग

  1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी मुंबई) ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवार १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत मेगाब्लॉक
  2. मेगाब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी मुंबई) ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला येथे थांबतील

हार्बर रेल्वे मार्ग

  1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी मुंबई) / वडाळा ते वाशी / बेलापूर / पनवेल डाऊन हार्बर मार्गावर रविवार १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११.३४ ते संध्याकाळी ४.४७ पर्यंत तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी मुंबई) ते वांद्रे / गोरेगाव डाऊन हार्बर मार्गावर रविवार १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ९.५६ ते संध्याकाळी ४.४३ पर्यंत मेगाब्लॉक असल्यामुळे रेल्वे वाहतूक बंद
  2. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी मुंबई) / वडाळा ते वाशी / बेलापूर / पनवेल अप हार्बर मार्गावर रविवार १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी मुंबई) ते वांद्रे / गोरेगाव अप हार्बर मार्गावर रविवार १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.४५ ते संध्याकाळी ४.५८ पर्यंत मेगाब्लॉक असल्यामुळे रेल्वे वाहतूक बंद 
  3. पनवेल ते कुर्ला दरम्यान मेगाब्लॉक काळात विशेष गाड्या धावणार
  4. मेगाब्लॉक असल्यामुळे रविवार १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत हार्बर मार्गावरुन प्रवास करू इच्छिणाऱ्यांना मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्यांमधून योग्य पास/तिकीट काढून प्रवास करता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी