Sharad Pawar on ST Strike : एसटीचे विलीनीकरण होणार नाही, शरद पवार यांचे स्पष्टीकरण

Sharad Pawar on ST merger एसटीचे विलीनीकरण होणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. आज एसटी कर्मचारी कृती समिती, खासदार पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात बैठक झाली.

थोडं पण कामाचं
  • एसटीचे विलीनीकरण होणार नाही
  • एसटीच्या विलीनीकरणावर राज्य सरकारने या आधी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
  • एसटीची प्रवाशांशी बांधिलकी

Sharad Pawar on ST Strike : मुंबई : एसटीचे विलीनीकरण होणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. आज एसटी कर्मचारी कृती समिती, खासदार पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की, एसटीच्या विलीनीकरणावर राज्य सरकारने या आधी स्पष्ट भूमिका घेतली आहे. यावर आपल्याला राजकारण करायचे नाही. एसटीची प्रवाशांशी बांधिलकी आहे. तसेच हा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही असेही पवार म्हणाले. (no merge of state transport in maharashtra government ncp chief sharad pwar clarify )
एसटी कर्मचार्‍यांच्या मागणीबात राज्य सरकार सकारात्मक आहे. एसटी सरू झाली पाहिजे यावरही सगळ्यांचे एकमत झाल्याचे पवार यांनी सांगितले. कृती समितीतील २० ते २२ प्रतिनिधींचा आग्रह रास्त आहे. त्यार प्रवाशांचे आणि एसटी महामंडळाचेही हित साधले पाहिजे. कृती समितीने जे कर्मचार्‍यांना आवाहन केले आहे त्याचा कर्मचार्‍यांनी गांभीर्याने विचार करावा असेही पवार यांनी नमूद केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी