मुंबई : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात (Girls hostel) काही पुरुषांनी आणि पोलिसांनी तेथील महिलांना कपडे काढून नृत्य करण्यास सांगितले (Cops forced woman to perform naked). १ मार्च रोजी घडलेल्या या घटनेची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रकरणावरुन भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत राज्यात असं सरकार हवंय कशाला? असा प्रश्न उपस्थित करत राज्यात राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही (there is no alternative in Maharashtra without presidential rule) असं म्हटलं आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं, "हा खूपच गंभीर विषय आहे. महाराष्ट्रात आमच्या आयाबहिणींना नग्न केलं जात, नाचायला लावायला सांगितलं जातं आणि गृहमंत्री म्हणतात नोंद घेतो? मृत मनाची माणसं मंत्री आहेत. तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. सांगितलं पाहिजे उत्तरात की एक तासात चौकशी करतो, काय कारवाई करणार तो अहवाल आम्ही देतो. गृहमंत्री केवळ नोंद घेतो म्हणतात. असं सरकार हवंय कशाला? आमच्या आयाबहिणींची अशा प्रकारे थट्टे केली जात असेल तर एकच मार्ग आहे राष्ट्रपती राजवट लागू करा."
राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, "आपण जरुर तपासून पहा. या देशातील लोकशाहीत कुणालाही अधिकार आहे की, तुमचं सरकार बरोबर चाललेलं नाहीये म्हणून हे सरकार बरखास्त करा असं म्हणण्याचा अधिकार आहे. पण ते का म्हणाले? याचं कारण म्हणजे व्हिडिओ क्लिप आली आहे. नुसती एखादी बातमी असती तर वेगळी गोष्ट आहे. पण त्या मुलीला पोलीस नग्न करुन नाचवत आहेत ही व्हिडिओ क्लिप आली आहे ते खूपच गंभीर आहे. आमची अपेक्षा इतकीच आहे, आपल्यावर विश्वास आहे पण आपण संवेदनशीलतेने या प्रकरणी कारवाई करावी."
जळगाव जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभाग यांच्यावतीने गणेश कॉलनी येथे आशादीप महिला वसतिगृह चालवण्यात येते. या ठिकाणी काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरून आलेल्या पुरुषांनी तेथील मुलींना कपडे काढून नृत्य करण्यास सांगितले. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. जनजनायक फाऊंडेशनच्या सदस्यांनी मंगळवारी वसतिगृहाला भेट देत मुलींशी चर्चा केली त्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडल्याचं समोर आलं. ही संतापजनक घटना वसतिगृहात १ मार्च रोजी घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिवेशनात माहिती दिली की, या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.