भोंग्यांचा वाद : सर्वांनी परवानगी घेतलीय कारवाई करण्याची गरज नाही - संजय राऊत

मुंबई
भरत जाधव
Updated May 04, 2022 | 18:21 IST

मुंबईसह महाराष्ट्रात भोंग्याबवर(LoudSpeker) आंदोलन (agitation) व्हावे अशी परिस्थिती नाही, सर्वांनी परवानगी घेतली आहे, त्यामुळे कारवाई करण्याची गरज नाही, मंदिर (Temple) आणि मशिदींना हाच नियम असल्याचं शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलातना सांगितलं.

There is no situation in the state where agitation can be started
भोंग्यांवरुन आंदोलन करांव अशी राज्यात परिस्थिती नाही-राऊत  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • बाळासाहेब ठाकरे सर्व प्रार्थना स्थळांवरील भोंगे बंद करा, असे म्हणालेच नव्हते. - संजय राऊत
  • मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून अनेक मनसे नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड पोलिसांनी केली.
  • बाळसाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांनीच देशाला हिंदुत्वाची शिकवण दिली. - संजय राऊत

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात भोंग्याबवर(LoudSpeker) आंदोलन (agitation) व्हावे अशी परिस्थिती नाही, सर्वांनी परवानगी घेतली आहे, त्यामुळे कारवाई करण्याची गरज नाही, मंदिर (Temple) आणि मशिदींना हाच नियम असल्याचं शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलातना सांगितलं. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) जोरदार टीका करताना म्हटलं की, शिवसेनेचं देशाला खरं हिंदुत्व शिकवलं असल्याचं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, आज पहाटेपासून राज्यात मशिदीबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे राज्यातील बहुतेक ठिकाणी भोंग्याच्या विना नमाज पठण झाले. तर ज्या ठिकाणी नमाज पठण झाले तेथे मनसे कार्यकर्त्यांनी लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा पठण करण्यात आली. मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून अनेक मनसे नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड पोलिसांनी केली. मनसेच्या या आंदोलनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मशिदींवरील भोंग्याचा आवाज आला नसल्यानं आंदोलन यशस्वी झालं मनसे कार्यकर्त्यांनी सांगितलं. परंतु शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वेगळाच राग आवळला आहे. 

महाराष्ट्रात शांतता असून राज्यात कोणताही विरोध होत नाही. राज्यात एकही बेकायदेशीर लाऊडस्पीकर चालू नाही. बाळसाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांनीच देशाला हिंदुत्वाची शिकवण दिली. शिवसेनाच हिंदुत्वाची मूळ शाळा असल्याचं राऊत म्हणालेत.  यावेळी त्यांनी भाजप आणि राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. हिंदुंसाठी आजचा काळा दिवस आहे. आज शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये काकड आरती झाली नाही. यामुळे अनेक भक्तांचा हिरमोड झाला असेही राऊत म्हणाले. राज ठाकरेंचा वापर राजकरणासाठी केला गेला आहे. त्यांचे भोंगे त्यांच्यावरच उलटत आहेत निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत.आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

राज ठाकरेंच्या या निर्णयानं हिंदू नाराज झाले आहेत हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं काम सुरु झालं आहे हिंदूमध्ये संताप आहे पण हिंदूनी आता संयम बाळगला पाहिजे असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.भारतीय जनता पक्षाने मनसेला पुढे आणत या प्रकरणी राज्यात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मंदिरावर आज भोंगे न लागल्याने लाखो हिंदू बांधवाची गैरसोय झाली. मशिदीवरील भोंग्याचे निमित्त करून मंदिरावरील भोंगे उतरवण्याचे काम भाजप आणि त्यांचे उपवस्त्र असलेल्या मनसेने केले आहे.

Read Also : सीईटीच्या ऑनलाईन अर्जासाठी 11 मेपर्यंत मुदतवाढ

हजारो मशिदीत आज अजान झालीच नाही, असे राज ठाकरे म्हणाले असेही खासदार संजय राऊतांनी म्हटले आहे. नियम सगळ्यांसाठी आहे, आणि याचा सर्वाधिक फटका कुणाला बसला असेल तर तो हिंदू धर्मिंयांना असे संजय राऊतांनी म्हटले आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी देखील पत्रकारांशी संवाद साधला होता. सकाळी बोलताना त्यांनी मनसेने समान नागरी कायद्याबद्दल बोलणे टाळावे, असे म्हटले होते.

Read Also : School Bus Fire : शाळेच्या बसला आग, ३ मुले गंभीर

राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचा व्हिडिओ ट्विट केल्यावरून संजय राऊत यांनी राज याच्यांवर जोरदार टीका केली. ज्यांनी बाळासाहेबांना सोडले, त्यांच्याकडून काय हिंदुत्व शिकायचे, असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच, या देशात हिंदुत्ववादाची मशाल बाळासाहेब ठाकरे व वीर सावरकर यांनीच पेटवली आहे. मात्र, काही जण आता बेगडी हिंदुत्ववाद्यांच्या खिशात गेले आहेत. अशांची दखल शिवसेना घेत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.राज ठाकरे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे सर्व प्रार्थना स्थळांवरील भोंगे बंद करा, असे म्हणालेच नव्हते. हिंदु धर्मीयांच्या अनेक सणांमध्ये भोंग्यांचा वापर केला जातो. तेदेखील भोंगे बंद करावे, अशी मनसेची भूमिका आहे का, असा सवालही संजय राऊत यांनी केला
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी