Raj Thackeray : अयोध्या दौऱ्यासाठी राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना दम, यावर कोणीही बोलण्याचा शहाणपणा करु नये

मुंबई
भरत जाधव
Updated May 08, 2022 | 07:27 IST

मनसे अध्यक्ष (MNS president) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका पत्रकाद्वारे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना हा संदेश दिला आहे. या संदेशात त्यांनी अयोध्या दौऱ्याविषयी (Ayodhya tour) विशेष सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Raj Thackeray
अयोध्या दौऱ्याबाबत पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीनं बोलावं  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अयोध्या दौऱ्याबाबत कोणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये, ज्यांना जबाबदारी दिली आहे त्यांनीही जबाबदारीने बोलावे - राज ठाकरे
  • उत्तर प्रदेशमधील भाजप खासदाराचा राज ठाकरेंना धमकीवजा इशारा

मुंबई: मनसे अध्यक्ष (MNS president) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका पत्रकाद्वारे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना हा संदेश दिला आहे. या संदेशात त्यांनी अयोध्या दौऱ्याविषयी (Ayodhya tour) विशेष सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अयोध्या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे मुख्यमंत्री (Chief Minister) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेऊ शकतात याला कोणताही त्रास होऊ नये यासठी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना याविषयी बोलण्यापासून रोखलं आहे. 

माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत कोणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये, ज्यांना जबाबदारी दिली आहे त्यांनीही जबाबदारीने बोलावे असा सज्जड दम राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. पक्षाच्या प्रवक्त्यांनी बोलावे, इतर कुणीही शहाणपणा करु नये असंही ते म्हणाले. राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना हा संदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, "पक्षाच्या प्रवक्त्यांशिवाय इतर कोणीही यावर बोलण्याचा शहाणपणा करु नये. तसेच इतर कोणत्याही विषयात पदाधिकारी वा इतरांनी काही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेच भाषेचे भान राखावे."

जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे 

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर वाद सुरू असून उत्तर प्रदेशमधील भाजपच्या खासदाराने राज ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला. त्यावर मनसेतील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता असल्याने मनसे नेत्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया या अडचणीच्या ठरू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच राज ठाकरेंनी हे पत्र जारी केल्याचंही सांगितलं जातं आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी