no vaccination in mumbai मुंबईत चार दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 04, 2021 | 01:35 IST

no vaccination in mumbai for four days मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व शासकीय आणि महापालिका केंद्रांवर गुरुवार ४ नोव्हेंबर २०२१ ते रविवार ७ नोव्हेंबर २०२१ असे चार दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद आहे.

no vaccination in mumbai for four days
मुंबईत चार दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद 
थोडं पण कामाचं
  • मुंबईत चार दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद
  • शासकीय आणि महापालिका केंद्रांवर गुरुवार ४ नोव्हेंबर २०२१ ते रविवार ७ नोव्हेंबर २०२१ लसीकरण बंद
  • सोमवार ८ नोव्हेंबर २०२१ पासून लसीकरण पूर्ववत सुरू

no vaccination in mumbai for four days मुंबईः मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व शासकीय आणि महापालिका केंद्रांवर गुरुवार ४ नोव्हेंबर २०२१ ते रविवार ७ नोव्हेंबर २०२१ असे चार दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद आहे. सोमवार ८ नोव्हेंबर २०२१ पासून लसीकरण पूर्ववत सुरू होईल. ही माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे. दिवाळी निमित्त मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत सर्व शासकीय आणि महापालिका केंद्रांवर चार दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद आहे. 

को-विन डॅशबोर्डनुसार मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आतापर्यंत १ कोटी ४७ लाख ९३ हजार ९१६ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले आहेत. मुंबईत ९१ लाख ४९ हजार ९२७ जणांना लसचा पहिला डोस तर ५६ लाख ४३ हजार ९८९ जणांना लसचा दुसरा डोस टोचण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या मुंबईत लसचा पहिला डोस घेण्यासाठी जो उत्साह दिसला त्या तुलनेत दुसरा डोस घेण्यासाठी कमी उत्साह आहे. यामुळे सुमारे तीन लाख नागरिकांनी त्यांच्या दुसऱ्या डोसची मुदत संपली तरी दुसरा डोस घेतलेला नाही. मुंबईत अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे यामुळेच प्रशासन दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांना शोधून त्यांना लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन करत आहे.

कोरोना विषाणूचे वेगवेगळे अवतार सक्रीय आहेत. यामुळे कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस घेतले तरी नागरिकांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे आणि मास्कद्वारे नाक-तोंड झाकावे; असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी