Navneet Rana : ऐन दिवाळीत खासदार नवनीत राणा तुरुंगात जाणार? कोर्टाकडून अटक करण्याचे वॉरंट जारी

Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. मुंबईच्या शिवडी कोर्टाने राणाविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. तसेच मुलुंड पोलिसांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत नवनीत राणा यांची रवानगी तुरुंगात होण्याची शक्यता आहे.

navneet rana
नवनीत राणा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
  • मुंबईच्या शिवडी कोर्टाने राणाविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
  • . त्यामुळे ऐन दिवाळीत नवनीत राणा यांची रवानगी तुरुंगात होण्याची शक्यता आहे.

Navneet Rana: मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. मुंबईच्या शिवडी कोर्टाने राणाविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. तसेच मुलुंड पोलिसांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत नवनीत राणा यांची रवानगी तुरुंगात होण्याची शक्यता आहे. शिवडी कोर्टाने दाखल केलेल्या अजामीनपात्र वॉरंटबद्दल नवनीत राणा  यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (nonbailable arrest warrant against mp navneet rana by sewri court)

अधिक वाचा : राणेंच्या संपर्कात असलेले ठाकरे गटातील ते 4 आमदार कोण?

आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात नवनीत राणायांनी खोटे जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते असा त्यांच्यावर आरोप आहे. याविरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 2021 साली कोर्टात सुनावणीदरम्यान राणा यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द केले होते. त्यामुळे नवनीत राणा यांची खासदारकीही धोक्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नवनीत राणा यांने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती देत राणा यांना दिलासा दिला होता. 

अधिक वाचा : Pune : रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना, दिवाळीला गावी निघालेल्या प्रवाशाचा चेंगराचेंगरीत मृत्यू

नवनीत राणांचे कुटुंबही आरोपांच्या पिंजर्‍यात

खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबीयांवरही खोट्या जातीच्या प्रमाणपत्राबद्दल आरोप आहेत. नवनीत राणा यांच्या वडिलांनी खोटे जातीचे प्रमाणपत्र बनवून शाळेत प्रवेश घेण्यासाठी खोटे कागदपत्र बनवले होते.

अधिक वाचा :Rain alert : ऐन दिवाळीत या ठिकाणी होणार मुसळधार पाऊस, राज्यात हवामान खात्याचा अलर्ट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी