Maharashtra Cabinet Expansion: उत्तर महाराष्ट्राला एक नाही दोन नाही थेट पाच मंत्रिपदे, राज्य सरकारमध्ये दबदबा वाढणार

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 10, 2022 | 07:00 IST

गेल्या ४० दिवसांपासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (State Cabinet Expansion  )मंगळवारी (९ ऑगस्ट) झाला. पहिल्या टप्प्यातील या मंत्रिमंडळ (Cabinet ) विस्तारात एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. ज्यामध्ये शिंदे गट आणि भाजपच्या (BJP) प्रत्येकी ९-९ जणांनी शपथ घेतली.

Maharashtra Cabinet Expansion
उत्तर महाराष्ट्राला एक नाही दोन नाही थेट पाच मंत्रिपदे  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राला असणारे झुकते माप त्याखालोखाल विदर्भाला स्थान दिले जाण्याचा शिरस्ताही यामुळे मोडला आहे.
  • नगर, नाशिक व नंदुरबारला प्रत्येकी एक मंत्रिपद लाभले.
  • शिवसेना-भाजप युतीच्या काळात मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांनी राज्यमंत्रिपद भूषवले होते.

मुंबई : गेल्या ४० दिवसांपासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (State Cabinet Expansion  )मंगळवारी (९ ऑगस्ट) झाला. पहिल्या टप्प्यातील या मंत्रिमंडळ (Cabinet ) विस्तारात एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. ज्यामध्ये शिंदे गट आणि भाजपच्या (BJP) प्रत्येकी ९-९ जणांनी शपथ घेतली. राज्याला नवीन मंत्री मिळत असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Nationalist Congress) प्रत्येक मंत्र्यावर टीका केली जात होती. दरम्यान हा विस्तार उत्तर महाराष्ट्रासाठी (North Maharashtra) फायद्याचा ठरला आहे. यंदा प्रथमच एक, दाेन नव्हे तर तब्बल पाच मंत्रिपदे उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला आल्याने या विभागाचा राजकीय दबदबा वाढणार आहे. 

मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राला असणारे झुकते माप त्याखालोखाल विदर्भाला स्थान दिले जाण्याचा शिरस्ताही यामुळे मोडला आहे. अर्थात, दोन वजनदार मंत्र्यांमुळे. याबरोबरच जळगावचे विभागात वर्चस्व राहणार असून नगर, नाशिक व नंदुरबारला प्रत्येकी एक मंत्रिपद लाभले असले तरीही धुळे जिल्हा मात्र मंत्रिपदापासून वंचित राहिला आहे. आता लक्ष पालकमंत्रिपदाची वाटणी कशी होते, त्याकडे लागले आहे.

Read Also : २०२४ मध्ये PM पदासाठी मोदींसमोर नितीश कुमार यांचं आव्हान?

शिवसेना-भाजप युतीच्या काळात मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांनी राज्यमंत्रिपद भूषवले होते. त्याच कामांच्या जोरावर पुन्हा त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्री करीत कृषिमंत्रिपदी त्यांची वर्णी लागली होती. त्यामुळे यंदा भुसे यांच्याऐवजी कांदे यांना मंत्रिपदाची लाॅटरी लागते की काय, अशी चर्चा होती. मात्र, भुसे मंत्री झाले. तेच नाशिकचे पालकमंत्री हाेतील असा दावा करण्यात येत आहे. अर्थात, त्यांच्यासमाेर कडवे आव्हान आहे ते माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे.जळगाव जिल्ह्यातून शिवसेनेची मुलूखमैदानी तोफ समजली जाणाऱ्या गुलाबराव पाटील यांचा शिंदे गोटातून तर भाजपतून देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासून म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांचा समावेश झाला.

Read Also :  या तारखेपासून भाद्रपद महिना, जाणून घ्या महिन्याचे आणि सणांच

नंदुरबारला अनपेक्षित लाभ मंत्रिमंडळात अनपेक्षितपणे नंदुरबारचे आमदार विजयकुमार गावित यांचा केला. गावित हे आदिवासी समाजातून असून सलग ५ वेळा आमदार असून राष्ट्रवादीच्या काळात आदिवासी विकास मंत्रिपद त्यांनी सांभाळले आहे. नाशिकला राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय असल्याने त्यांचा नाशिकच्या राजकारणातील हस्तक्षेप वाढू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी