महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री, मुंबई शहर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे मालाडचे आमदार अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अस्लम शेख यांना मालाडच्या मढ परिसरातील एक हजार कोटी रुपयांच्या फिल्म स्टुडिओ प्रकरणी पर्यावरण विभागाने नोटीस बजावली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नियमानुसार कठोर कारवाई करावी असा आदेश देणारे पत्र पर्यावरण विभागाने मुंबई जिल्हाधिकारी आणि मुंबई मनपा प्रशासन यांना पाठविले आहे. यामुळे स्टुडिओचे बांधकाम पाडले जाण्याची शक्यता वाढली आहे. ( notice Issued Against Aslam Shaikh In Illegal Studio Scam seeks Action )
काही दिवसांपूर्वी भाजपच्या किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून अस्लम शेख यांनी स्टुडिओसाठी बांधकाम सुरू केले असल्याचे सोमय्या म्हणाले होते. अस्लम शेख मालाडच्या मढ परिसरात २८ स्टुडिओ बांधत आहेत. यापैकी पाच स्टुडिओचे बांधकाम सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करत आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. आता याच प्रकरणात अस्लम शेख यांना पर्यावरण विभागाने नोटीस बजावली आहे.
किरीट सोमय्या यांनी ट्वीट करून अस्लम शेख यांना पर्यावरण विभागाने नोटीस बजावल्याचे वृत्त दिले. तसेच अस्लम शेख यांच्या सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामावर कारवाई होईल असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.