Notice to Ajit Pawar from Income Tax Department : आजचा दिवस दादांचा ! आयकर विभागाकडून अजित पवारांना नोटीस, १ हजार कोटींची संपत्ती जप्त होण्याची शक्यता

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 02, 2021 | 10:45 IST

Notice to Ajit Pawar from Income Tax Department :माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने अटक केली. या पहिल्या धक्क्यातून सावरत नाही तोच आज सकाळी महाविकास आघाडी सरकारला(Mahavikas Aghadi Sarkar) दुसरा धक्का बसला.

Notice to Ajit Pawar from Income Tax Departmen
आयकर विभागाकडून अजित पवारांना नोटीस  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अजित पवारांशी संबंधित कोट्यावधींची संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश
  • अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी व पार्थ पवार यांच्या कार्यालयातही आयकर विभागाची छापेमारी
  • जप्ती आणण्याचे आदेश दिलेल्या संपत्तीची किंमत जवळपास १ हजार कोटींपेक्षा जास्त.

Notice to Ajit Pawar from Income Tax Department :मुंबईः माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने अटक केली. या पहिल्या धक्क्यातून सावरत नाही तोच आज सकाळी महाविकास आघाडी सरकारला(Mahavikas Aghadi Sarkar) दुसरा धक्का बसला. राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने (Income Tax Department) कारवाई सुरू केली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार अजित पवारांशी संबंधित कोट्यावधींची संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश दिले आहेत.

मागील काही दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीय हे आयकर विभागाच्या रडारवर आहेत. अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी व पार्थ पवार यांच्या कार्यालयातही आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्यानंतर आज आयकर विभागाकडून अजित पवारांना नोटीस देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 
या कारवाईअंतर्गंत अजित पवारांशी संबंधित कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पवारांना ९० दिवसांच्या कालावधीत प्रॉपर्टी बेनामी नसल्याची सत्यता सिद्ध करावी लागणार आहे. आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी निगडीत ५ संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश दिले असून ही संपत्ती जवळपास १ हजार कोटींपेक्षा जास्त आहे.

कोणत्या मालमत्तांवर कारवाई?

जरंडेश्वर साखर कारखाना- (जवळपास ६०० कोटी)
दक्षिण दिल्लीतील फ्लॅट- (जवळपास २० कोटी)
पार्थ पवार यांचे मुंबईतील कार्यालय -( जवळपास २५ कोटी)
गोव्यातील रिसॉर्ट- ( जवळपास २५० कोटी)
राज्यातील वेगवेगळ्या २७ जिल्ह्यातील जमीनी -( जवळपास ५०० कोटी)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी